घरट्रेंडिंगमोदींच्या कार्यकाळात गुगलवर नोकरी शोधणाऱ्यांची संख्या वाढली

मोदींच्या कार्यकाळात गुगलवर नोकरी शोधणाऱ्यांची संख्या वाढली

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली निवडणूक प्रचारात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करु, असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन काही प्रत्यक्षात आले नाही, असे दिसत आहे. कारण २०१६ पासून गुगलवर “Jobs near me” हा किवर्ड चांगलाच ट्रेंड होताना दिसत आहे. गुगलने काल यावर्षात टॉप ट्रेडिंग झालेल्या शब्दांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये Near Me या कॅटेगरीमध्ये “Jobs near me” हा किवर्ड दहाव्या नंबरवर आहे. विशेषतः हा किवर्ड २०१६ नंतर अचानक टॉप ट्रेंडिगमध्ये आल्याचे गुगलकडून सांगण्यात आले आहे.

गुगलने या किवर्डचा २००४ पासूनचा ग्राफ दाखवला आहे. यामध्ये २००४ पासून ते २०१४ पर्यंत या किवर्डला सर्च केले जात नव्हते. २०१४ पर्यंत खुप कमी वेळा गुगलवर जॉब शोधला जात होता. मात्र २०१६ पासून नोकरी शोधण्याचा हा ट्रेंड वाढलेला दिसून येत आहे.

- Advertisement -
Google Search – पुणेकरांना आवडते हरयाणवी नर्तिका

गुगलने आपल्या अहवालात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. २०१४ साली या किवर्डला क्रमांक १ (म्हणजे सर्वात खाली) दिला होता. त्यानंतर तो वाढत १७ झाला आणि २०१७ साली तो ५० वर पोहोचला होता. मात्र एप्रिल २०१८ साली अचानक या किवर्डने १०० नंबरचा पल्ला गाठला आहे. याचा अर्थ या वर्षभरात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या वाढली असून भारताच्या विविध राज्यातून, दिवसभरात अनेकदा या किवर्डने लोक सर्चिंग करत आहेत.

गुगल किवर्डचा क्रमांक कसा ठरवतो?

एखाद्या किवर्डने १०० क्रमांक मिळवला म्हणजे त्याची लोकप्रियता शिखरावर पोहोचली असल्याचे मानले जाते. ५० क्रमांक म्हणजे अर्धी लोकप्रियता आणि ० ते १ म्हणजे त्या किवर्डला लोकांकडून फारसे सर्च केले जात नाही.

- Advertisement -

कुठे ट्रेंड झाला हा किवर्ड

जॉब्स नियर मी, हा किवर्ड सिकंदराबाद येथे सर्वात जास्त सर्च केलेला आहे. त्यानंतर ठाणे, नवी मुबंई, फरीदाबाद, गाझीयाबाद, पिंपरी-चिंचवड, विशाखापट्टणम, बंगळुरु, हैदराबाद आणि गुरुग्राम या शहरांमध्ये हा किवर्ड अधिक सर्च केला जात आहे.

‘इअर इन सर्च’मध्ये प्रिया वॉरियर गुगलवर हिट

Near Me मध्ये अजून काय?

गुगलने दिलेल्या यावर्षीच्या सर्च अहवालात नीयर मी या कॅटेगरीमध्ये ‘मोबाईल स्टोअर नीयर मी’ हा किवर्ड प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘सुपरमार्केट्स नीयर मी’, गॅस स्टेशन्स नीयर मी, अशा प्रकारच्या किवर्डचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -