घरट्रेंडिंगआता बस्स झाला कोरोना, कपल्स कोरोनाला वैतागून मेट्रोतच Kiss करत सुटले

आता बस्स झाला कोरोना, कपल्स कोरोनाला वैतागून मेट्रोतच Kiss करत सुटले

Subscribe

कोरोना व्हायरमुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आणि सार्वजनिक क्षेत्रावर अनेक निर्बंध लावण्यात आले. पण आता काही देशातील लोकं लॉकडाऊनला वैतागले आहेत. असंच काहीस रशियात पाहायला मिळालं आहे. कोरोना संबंधित निर्बंधाला विरोध दर्शवण्यासाठी लोकं मेट्रोमध्ये किस करू लागले. रशियातील येकातेरिनबर्ग (Yekaterinburg) शहरात चालत्या मेट्रोमधून अनेक कपल्सनं किस करून कोरोना निर्बंधाला विरोध केला.

- Advertisement -

या मेट्रोमधील काही लोकांनी लाईफ वेबसाईटसोबत बातचित करताना सांगितलं की, ‘आम्हाचा कोणाचाही भावानांना दुखवण्याचा आणि सार्वजनिक सेवेला खराब करण्याचा हेतू नाही आहे. दरम्यान अनेक म्युझिशियन्स देखील कोरोनाच्या निर्बंधांविरोधात बोलत आहेत. आमचा निषेध या कडक निर्बंधाविरोधात असून आम्ही म्युझिक इंडस्ट्रिला पूर्ण पाठिंबा देत आहोत.’

या ग्रुपशी संबंधित असलेली लोकं म्हणाले की, ‘कोरोना व्हायरस धोका कॉन्सर्ट्स आणि रेस्टॉरंट्समध्ये जास्त आहे, असं सरकारचं म्हणणं असून यामुळे नाईटक्लब्स आणि संध्याकाळाचे कार्यक्रमात जाण्यास बंदी घातली गेली आहे. याचदरम्यान लोकं मेट्रोमध्ये गर्दी प्रवास करीत आहे, मात्र सरकारला याचा त्रास होत नाही. अशा ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक असतो.’

- Advertisement -

कोरोनामुळे जगभरातील म्युझिक आणि नाईट लाईफ सेक्टर परिस्थिती खूप वाईट झाली आहे. कोरोना काळापूर्वी ब्रिटनमध्ये म्युझिक इंडस्ट्रीत ११ टक्क्यांनी वाढ झाली होती आणि यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत जवळपास ६ बिलियन पाउंड्स योगदान झाले. परंतु कोरोना काळामुळे फक्त ३ बिलियन पाउंड्स म्युझिक इंडस्ट्रीने दिले. यामुळे युके सरकारनं संगीत स्थळं, फेस्टिव्हल्स आणि म्युझिकची संस्कृती वाचवण्यासाठी दीड अब्ज पाउंड निधी जारी केला होता. यापूर्वी अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनबद्दल लोकं खूप संतापले होते, कारण लोकं दररोजच्या सुविधांचा लाभ घेऊ शकत नव्हते.


हेही वाचा – कुणाचं काय तर कुणाचं काय, खिडकीतून चड्ड्या,खुर्च्या फेकत नव वर्षाचं स्वागत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -