Live Update: देशात एकूण २ कोरोना लसींना परवानगी

corona omicron unlock update Holi 2022 Maharashtra Politics Heat wave IPL 2022
corona omicron unlock update Holi 2022 Maharashtra Politics Heat wave IPL 2022

सिरम पाठोपाठ आता आणखी एका लसीला भारतात परवानगी मिळाली आहे.


डिसी डिझाइन या कारचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढला आहे. छाब्रिया यांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. परराज्यात जाऊन तपास करावा लागणार असल्याने गुन्हे शाखेने पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी केली होती. छाब्रिया यांच्या घरी १५१ फाईल्स सापडल्या आहेत, ज्या संशयास्पद आहेत त्यांची पडताळणी करणे गरजेचे आहे, असे मुंबई पोलीस म्हणाले.


बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे समोर आले आहे.


पहिल्या टप्प्यात ३ कोटी कोविड योद्ध्यांना मोफत लस मिळणार

कोरोनाच्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी आरोग्यसेवक, २ कोटी इतर कोविड योद्ध्यांना मोफत लस दिली जाणार आहे. संपूर्ण देशात मोफत लस देण्याचं विधान केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार बूटा सिंह यांचं आज सकाळी निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


देशात गेल्या २४ तासांत १९ हजार ७८ नवे रुग्ण आढळले असून २२ हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २२४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील आता कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ३ लाख ५ हजार ७८८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४९ हजार २१८ जणांचा मृत्यू झाला असून ९९ लाख ६ हजार ३८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच २ लाख ५० हजार १८३ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.


देशात आजपासून कोरोना लसीकरणाचा ड्राय रन

देशात आजपासून कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात होणार आहे. राज्यातील चार जिल्ह्यांची ड्राय रनसाठी निवड झाली आहे. पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार जिल्ह्यात आजपासून ड्राय रनला सुरुवात होणार आहे. लसीकरणाच्या तयारीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


आतापर्यंत जगातील ५ कोटी ९६ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

जगातील कोरोना व्हायरस कहर अजूनही कायम आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ८ कोटी ४३ लाख ५६ हजार पार झाली आहे. यापैकी आतापर्यंत १८ लाख ३४ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ कोटी ९६ लाख २६ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.