‘#sareetwitter’ ट्रेंडचा प्रचंड धुमाकूळ; नेमकं प्रकरण काय?

‘जेसीबी की खुदाई’ च्या ट्रेंडनंतर आता #sareetwitter चा धुमाकूळ सुरु झाला आहे.

Mumbai
#sareetwitter trend top in social media
‘#sareetwitter’ ट्रेंडचा प्रचंड धुमाकूळ

सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘जेसीबी की खुदाई’ हा ट्रेंड प्रंचड धुमाकूळ घालत होता. #JCBKiKhudayi या ट्रेंडच्या मिम्सने सोशल मीडियावर अक्षरक्ष: गोंधळ घातला होता. तर गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर साडी ट्रेंड सुरु आहे. सेलिब्रीटींपासून ते राजकारण्यापर्यंत साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. त्यामुळे ट्विटरवर #sareetwitter हा ट्रेंड सुरु आहे. तरीदेखील काही लोकांना #sareetwitter हा ट्रेंड टॉपवर कसा आला? हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे बऱ्याच युजर्सला ही भानगड काय ते अजूनही समजलेले नाही.

यामुळे ट्विटरवर साडी ट्रेंड झाला सुरू

#sareetwitter हा ट्रेंड सुरु झाला तो न्यूयॉर्क टाइम्सच्या एका लेखामुळे. न्यूयॉर्क टाइम्सने लिहिलेल्या एका लेखात २०१४ मध्ये भाजप सरकार निवडून आल्यानंतर भारतात साडीला एचानक खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर बनारसी साडीच्या विणकरांकडे लक्ष दिले गेले नाही, असे या लेखात मांडण्यात आले आहे. हा लेख प्रसिद्ध होताच काही जणांनी या लेखावर तीव्र नाराजी व्यक्त करत लेखात चुकीच्या पद्धतीने वर्ण केल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी न्यूयॉर्क टाइम्सला चुकीचे ठरवत सोशल मीडियावर साडीसोबत फोटो पोस्ट केले आणि त्यानंतर #sareetwitter हा ट्रेंड सुरु झाला.

या ट्रेंडमध्ये सहभागी होत बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींनी साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. तर प्रियंका गांधीने देकील त्यांचा साडीतील जूना फोटो शेअर केला आहे.

 

शिवसेनेच्या नेता प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील ट्रेंडचा फायदा घेत साडीतील फोटो शेअर केले आहे.

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी देखील शेअर केला साडीतील फोटो