Video: चोरी करण्यासाठी आला आणि किस घेऊन गेला!

Brasilia
Thief kisses old woman on forehead while robbing store. Viral video tells you why

ब्राझीलमधील एक वयोवृद्ध महिला औषध घेण्यासाठी मेडिकल मध्ये गेली होती. मात्र नेमकं त्याचं वेळी दोन चोरड्यांनी त्या मेडिकल स्टोअरवर दरोडा टाकला. त्यामुळे ती वयोवृद्ध महिला घाबरली. तिने एका चोराला पैसे देण्याची ऑफर केली. मात्र, त्या चोराने ती ऑफर नाकारली आणि चक्क तिच्या कपाळावर किस घेतली. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दुसरा साथीदार हा कॅश काऊंटवरील कर्मचाऱ्यांला लुटतं होता. मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून ती सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमेराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये चोर त्या वयोवृद्ध महिलेला पैशांची ऑफर नाकारत तिच्या खांद्यावर थाप मारली. तसंच त्यानंतर तिच्या कपाळावर किस घेऊन तो तिच्याशी बोलला.

डेली मेलच्या वृत्तानुसार, मेडिकल स्टोअरच्या मालक सॅम्युअल अल्मेडा यांनी असं सांगितलं की, ‘ती वृद्ध महिला चोराकडे गेली आणि त्याला पैसे घेण्यास सांगितलं. मात्र त्या चोराने तिला नकार दिला आणि तिला सांगितलं की, ‘नको आई, तू शांत राहा. मला तुझे पैसे नको’ या चोरांनी मेडिकलमधून २४० डॉलर्स आणि इतर सामान चोरून ते पलायन झाले.

हेही वाचाVIDEO: लेडी गागाला कडेवर घेऊन चाहता स्टेजवरून कोसळला, गागाचे चाहते हळहळले!