घरट्रेंडिंगठाकरेंच्या शपथविधीनंतर ट्विटरवर ट्रेंड होतंय #SorryBalaSaheb

ठाकरेंच्या शपथविधीनंतर ट्विटरवर ट्रेंड होतंय #SorryBalaSaheb

Subscribe

एकीकडे उद्धव यांचा शपथविधी संपन्न झाला तर दुसरीकडे ट्विटरवर #SorryBalaSaheb ट्रेंड होण्यास सुरूवात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येत राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. भाजप आणि शिवसेना यांच्यामधील युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने शिवसेनेने सरकार स्थापन केले. नव्याने स्थापन झालेल्या या सरकारचा आज ऐतिहासिक क्षण होता.

मात्र, एकीकडे उद्धव यांचा शपथविधी संपन्न झाला तर दुसरीकडे ट्विटरवर #SorryBalaSaheb ट्रेंड होण्यास सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे सरकार स्थापन झाल्याने ट्विटरवर काही ट्विटर युजर्स नाराज झाल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे माफी मागतली आहे. ट्विटरवर #SorryBalaSaheb हा हॅशटॅगचा जोरदार वापर करत शिवसेनेला त्यांच्या पुर्वीच्या भूमिकेचे स्मरण करून दिल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

#SorryBalaSaheb 

- Advertisement -


‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की….’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -