घरUncategorizedIndia vs New Zealand: भारताला व्हाइट वॉश, न्यूझीलंडचा तिसऱ्या सामन्यातही विजय

India vs New Zealand: भारताला व्हाइट वॉश, न्यूझीलंडचा तिसऱ्या सामन्यातही विजय

Subscribe

न्यूझीलंडने भारताला तिसऱ्या वनडे सामन्यातही पराभूत केले आहे. न्यूझीलंडने भारताला तिसऱ्या सामन्यातही पराभूत करत ही मालिका ३-० अशी सहजपणे खिशात टाकली आहे.

न्यूझीलंडने भारताला तिसऱ्या सामन्यातही पराभूत करत ही मालिका ३-० अशी सहजपणे खिशात टाकली आहे. न्यूझीलंडने भारताला तिसऱ्या वनडे सामन्यातही पराभूत केले आहे. न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर पाच विकेट राखत विजय मिळवला आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड सोबतच्या अखेरच्या सामन्यात विराट कोहलीची ‘टिम इंडिया’  किमान शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरली होती. मात्र मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या आघाडीला पुन्हा अपयश आले आहे.

- Advertisement -

टिम इंडियाने प्रथम फंलदाजी करताना ५० षटकांमध्ये ७ बाद करत २९६ धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीला आलेला मयांक अग्रवाल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले असून पृथ्वी शॉ देखील मोठी खेळी करू शकला नाही. पृथ्वी शॉ ४० धावांवर तर अय्यर अर्धशतकानंतर ६२ धावांवर बाद झाला. पाचव्या स्थानावर उतरलेल्या के. एल राहूलने पुन्हा एकदा शानदार फलंदाजीचे दर्शन घडवले. मनिश पांडेने ४२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बेनेटने सर्वाधिक बळी घेतले, तर निशम, जेमीसनने प्रत्येक १ बळी घेतला.

केएल राहुलची शतकी खेळी; न्यूझीलंडविरुद्ध रचला इतिहास

केदार जाधवच्या जागी आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या मनीष पांडेने पाचव्या विकेटसह अर्धशतक पार केले. भारताने ४० षटकांत दोनशेचा पल्ला गाठून पाचची सरासरी कायम ठेवली. लोकेश आणि श्रेयस यांची शतकी भागीदारी न्यूझीलंड संघाच्या जेम्स निशॅमने संपुष्टात आणली. श्रेयसने ६३ चेंडूत ६२ धावा केल्या. तर लोकेश राहुलनं शतक पूर्ण करताना आगळ्या वेगळ्या पंक्तीत स्थान निर्माण केले आहे. आशियाई देशांबाहेर पाचव्या क्रमांकावर शतक पूर्ण करणारा लोकेश राहूल हा तिसरा भारतीय ठरला आहे. सर्वात कमी डावांमध्ये हा पराक्रम करणाऱ्या लोकेशने भारतीय फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले आहे. तिसऱ्या वनडेतील राहुलच्या शतकी खेळीने एक नवा इतिहास रचला गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -