घरUncategorizedआता नासा घडवणार सूर्याचे 'जवळून' दर्शन

आता नासा घडवणार सूर्याचे ‘जवळून’ दर्शन

Subscribe

नासाकडून ही मोहिम राबवली जाणार असून ही जगाच्या इतिहासातील मोठी घटना असणार आहे. अवघ्या ६० लाख ८० हजार किलोमीटर अंतरावरुन सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे.

आकाशातला तो लाल गोळा काय आहे तो मला हवा आहे असा हट्ट जेव्हा साक्षात हनुमंताने बाळ असताना आई अंजनीकडे केला आणि त्याने सूर्याच्या दिशेने आकाशात झेप घेतली. सुर्याची दाहकता पाहता त्याला अडवण्याचा प्रयत्न इंद्र देवाने केला आणि बाळ हनुमानाला मुर्च्छा आणण्यासाठी त्याच्यावर वज्राघात केला होता. आता तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आठवली असेल. सूर्याची दाहकता आपण पृथ्वीवरुन सहन करुन शकत नाही असे असताना आता नासा चक्क या लाल गोळ्याचे जवळून दर्शन घडवणार आहे. त्यासाठी नासाची ‘टच द सन’ नावाची मोहिम असून फ्लोरीडामध्ये रात्री १वाजून ४२ मिनिटांनी हे यान अवकाशात झेपावले आहे.

- Advertisement -

काय आहे मिशन ‘टच द सन’ ?

आतापर्यंत चंद्र आणि मंगळ मोहिमा यशस्वी झालेल्या आपण पाहिल्या आहेत. पण सूर्याजवळ जाण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. नासाकडून ही मोहिम राबवली जाणार असून ही जगाच्या इतिहासातील मोठी घटना असणार आहे. अवघ्या ६० लाख ८० हजार किलोमीटर अंतरावरुन सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. याआधी देखील सूर्य मोहिमा करण्यात आल्या आहेत. या आधी हेलिओस २ हे यान १९७६ साली गेले होते. ज्याने सूर्याचा अभ्यास ४ कोटी ३०लाख २० हजार किलोमीटर अंतरावरुन हा अभ्यास केला होता. सूर्याची दाहकतेपोटी कशाचाच टिकाव लागत नाही. म्हणूनच हे यान ४.५ इंच जाडीच्या कार्बन कंपोझिट शील्डपासून तयार करण्यात आले आहे. तर यान आतून सुरक्षित राहण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

सूर्याचा होणार अधिक अभ्यास?

आगीचा गोळा व्यतिरिक्त सूर्याची अन्य ओळख आपल्याला नाही. पण आता या मोहिमेतून सूर्यावरील मॅग्नेटीक फिल्ड, प्लाझमा, इनरजेटिक पार्टिकल्स, सोलार विंड याचा अभ्यास केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -