Mi आणणार ऑनलाइन नेट बॅंकिंग अॅप

युपीआय द्ववारे १२० पेक्षा आधिक बॅंकांच्या डेबिट, क्रेडिट आणि इंटरनेट बॅंकिंग द्वारे युजर्सना ऑनलाईन व्यवहार करता येणार आहे.

Mumbai
mi
फाईल फोटो

मोबाईल जगतात सध्या बाजारात प्रसिद्ध असलेल्या चीनच्या xiom ने प्रायोगिक तत्वावर भारतात mi pay हा ऑनलाईन अॅप लॉंच केला आहे. icici बॅंके या अॅपसाठीची सर्विस प्रोवाईडर बॅंक आहे. या अॅपद्वारे युपीआय सर्विस बरोबरच डेबीट कार्ड, क्रडिट कार्ड, नेटबॅंकिंग द्वारे यूजर्सना व्यवहार करता येणार आहे. लवकरच एम आय पे अॅप प्ले स्टोअरवर येणार आहे. गुगल पे, फोन पे प्रमाणेच एम आय ऍप वापरणाऱ्यांना मनी ट्रान्सपर बरोबरच मोबाईल रिचार्ज, बील भरण्यासाख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.

हे असतील स्पर्धक

नोटबंदी नंतर आलेल्या डिजिट इंडिया या नाऱ्या अंतर्गत चहा पासून ते मोठ मोठ्या वस्तूंच्या खरेदी या ऑनलाईन पे अॅप द्वारे करण्याचा वापर वाढला. आज ग्रामीण भागा पासून शहरी भागा पर्यंत सगळीकडे लोक, प्रामुख्याने तरुण ऑनलाईन व्यवहारावर करतात. त्यामुळे गुगल पे, फोन पे, पेटीअम, यांसारख्या ऍपने युजर्सना अनेक कॅश बॅक, डिस्काउंट सारख्या ऑफर देत आपले युजर्स वाढवले आहेत. त्यामुळे एम आय पे ऍपला या ऍप पेक्षा वेगळ्या, नवीन किंवा चांगल्या ऑफर्स देत ग्राहकांना आकर्षीत करावे लागणार आहे. त्यामुळे या ऍपशी एम आय पे फोनची स्पर्धा असणार आहे.

कोणते अॅप कधी आले

गुगल ने आणलेले सध्याचे गुगल तेज या अॅपचे आधीचे नाव गुगल पे असे होते. या अॅपद्वारे मनी ट्रान्सफर, इलेक्ट्रीक बिल, मोबाईल रिचार्ज, मोबाईल बिल यासारख्या सुविधा उरपलब्ध आहेत. गुगल पे हे इतर पे अॅपच्या तुलनेत वारण्यास सोपे आणि युजर्स फ्रेडली आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्याशी चाटिंग करतो, तितकेच सोपे एखाद्याला ऍपद्वारे पैस ट्रान्सपर करणे सोपे आहे. तसेच एखाद्या ट्रांजेक्शन वर रिवर्ड देखील मिळतात, प्ले स्टोअरवर गुगल तेज उपलब्ध आहे. त्याचबरोबर ३०० मिलियन पेक्षा जास्त लोक पेटीअम हे पे अॅप वापरतात, या ऍपवरुन देखील मनी टान्सपर, मोबाईल रिचार्ज, रेल्वे तिकिट यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. २०१५ साली आलेले फोन पे अॅपचे युजर्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत. पे फोन वापरुन पेट्रोलचे बील भरल्यास सुट मिळते, त्वरीत ट्रान्जेक्शन साठी हा अॅप प्रसिद्ध आहे. इंग्रजीसह मराठी, हिंदी, तेलगु, तमिळ, गुजराती, बंगाली, कन्नड आश्या विविध भाषा या ऍपवर युजर्ससाठी उपलब्ध आहे.