घरमहाराष्ट्रमहायुतीतील मित्रपक्षांच्या वाट्याला १४ जागा

महायुतीतील मित्रपक्षांच्या वाट्याला १४ जागा

Subscribe

अन्य पक्षातून असलेल्या नेत्यांची नवी सुभेदारी सांभाळताना नाकीनऊ आलेल्या भाजपने मित्रपक्षांसाठी बुधवारी जागावाटप केले. त्यानुसार रामदास आठवलेंच्या रिपाइंला ६ जागा, सदाभाऊ खोत यांच्या रयतक्रांती पक्षाला ३ जागा, विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला ३ जागा तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला २ जागा अशा १४ जागा देण्यात आल्या आहेत. भाजपने या जागा युतीत त्यांना मिळालेल्या १६४ जागांमधून दिल्या असल्यामुळे भाजप आता १५१जागांवर लढणार आहे. महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला १२४ जागा आल्या आहेत.

असे आहे जागावाटप
महायुतीची घोषणा झाल्यानंतर जागावाटपाचे गणित कसे सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजप-सेनेच्या वाट्याला किती जागा येणार? मित्रपक्षांच्या वाट्याला कोणत्या जागा येणार, यावर चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र हा जागावाटपाचा तिढा सुटला असून त्यात सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर या जागा रिपाइंला सोडण्यात आल्या आहेत. तशी अधिकृत घोषणा बुधवारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वांद्रे संविधान निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

- Advertisement -

शिवाजीनगर-मानखुर्दच्या जागेबाबत घोळ
मुंबईतील शिवाजीनगर-मानखुर्दची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आली होती. तेथे शिवसेनेने विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिली होती. त्या जागेवर रामदास आठवले यांनी गौतम सोनावणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीत मानखुर्दची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले होते. त्यामुळे मी तेथे गौतम सोनावणे यांची उमेदवारी जाहीर केली. या जागेबाबत मी मुख्यमंत्र्यांना गळ घातली आहे, ते त्यातून मार्ग निश्चित काढतील, असा दावा आठवले यांनी केला आहे.

फलटणच्या जागेबाबत संभ्रम कायम
सदाभाऊ खोत यांच्या रयतक्रांती पक्षाला फलटण, पंढरपूर आणि अक्कलकोट या 3 जागा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला दौंड आणि जिंतूर हा मतदारसंघ देण्यात आला आहे. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला वर्सोवा, किनवट आणि चिखली या जागा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सातार्‍यातील फलटणच्या जागेबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. तर शिवाजीनगर-मानखुर्द ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. मात्र रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातल्यानंतर ती जागा आठवलेंसाठी शिवसेनेने सोडली आहे.

- Advertisement -

रिपब्लिकन पक्ष -६ जागा -माळशिरस, भंडारा, नायगाव,
पाथरी, मानखुर्द,अजून एक जागा
(रामदास आठवले)

रयतक्रांती पक्ष -३ जागा -फलटण, पंढरपूर, अक्कलकोट
(सदाभाऊ खोत)

शिवसंग्राम पक्ष -३ जागा -वर्सोवा, किनवट, चिखली
(विनायक मेटे)

राष्ट्रीय समाज पक्ष -२ जागा -दौंड, जिंतूर
(महादेव जानकर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -