घरमहाराष्ट्रमहायुतीत रासपवर अन्याय झाला - महादेव जानकर

महायुतीत रासपवर अन्याय झाला – महादेव जानकर

Subscribe

राष्ट्रीय समाज पक्ष आपल्या चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवणार, असे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले आहेत. दौंड विधानसभा मतदारसंघातील रासपचे एकमेव आमदार राहुल कुल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या युतीत रासपला विधानसभा निवडणुकीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील एका जागेवरील रासपच्या ठरलेल्या उमेदवाराने ऐनवेळी भाजपच्या एबी फॉर्मवर अर्ज दाखल केला. त्यामुळे महादेव जानकर अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान, गंगाखेड येथील जागेवर रासप आपल्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, अशी भूमिका महादेव जानकर यांनी घेतली आहे.

रासप आपल्याच चिन्हावर लढणार – महादेव जानकर

‘राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे. रासपला त्यांनी दोन जागा सोडल्या होत्या. परंतु, तरीही आमच्यासोबत अन्याय झाला. रासपकडून उमेदवाराला एबी फॉर्म दिला असताना त्याच उमेदवाराला भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे मोठी फसवणूक रासपची झाली आहे. भाजपने लोकसभेच्या वेळी देखील निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवली नाही. मी त्यांच्याशी सत्यपणे वागलो. मी त्यांना असेही सांगितले होती की, तुम्ही मला फक्त दोन जागा द्या, मात्र मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर लढणार. रासपसाठी मी माझे संपूर्ण आयुष्य व्यथित केले आहे. त्यामुळे मी पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे. युतीत रासपला दोन जागा दिल्या असताना भाजपने रासपच्या उमेदवाराला एबी फॉर्म का दिला?’, असा प्रश्न महादेव जानकर यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – मोदी-पवारांमधला कलगीतुरा रंगणार; प्रचारसभेच्या तारखा जाहीर

त्याचबरोबर ‘भाजपकडून रासपवर अन्याय झाला आहे. मात्र मी आता बाहेर पडणार नाही. केंद्राकडून रासपला दोन जागा सोडण्यात आल्साय होत्या. मात्र, राज्यातील भाजप कमिटीने माझ्यावर अन्याय केला. मला मंत्रीपद किंवा आमदारकी नकोय मात्र आता या स्थानावर आल्यानंतर मागे हटायचे नाही. मी स्वाभिमानी आहे. मात्र, आता युती सोडणार नाही. याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोललो असता त्यांनी याबाबत आपल्याला माहित नसल्याचे सांगितले. भाजपचे चंद्रकांत पाटील आणि मुख्यत्र्यांनी तुम्ही तुमच्या चिन्हावर लढा असे सांगितले आहे. त्यामुळे मी माझ्या चिन्हावरच लढणार आहे’, असे महादेव जानकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -