घरमुंबईशिवसेनेने पाठिंबा दिल्यास आम्ही सत्ता स्थापन करू - काँग्रेस

शिवसेनेने पाठिंबा दिल्यास आम्ही सत्ता स्थापन करू – काँग्रेस

Subscribe

'जर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर राज्यपालांनी महाआघाडीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण द्यावे आणि जर शिवसेनेने महाआडीला पाठिंबा दिला तर सत्ता स्थापनेचा आम्ही विचार करु', असे मिलिंद देवरा म्हणाले आहेत.

‘शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला तर सत्ता स्थापनेचा विचार करु’, असे काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा म्हणाले आहेत. एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरुन तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे आहे. त्यामुळे युतीला सत्ता स्थापनेसाठी पुरेशा जागा असूनही महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सूटलेला नाही. आता तर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी सत्ता स्थापनेसाठी मोठे विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेला जाईल, याचा अंदाज बांधणे सध्या तरी अशक्य आहे.


हेही वाचा – भाजप सरकार पडल्यानंतर पर्यायी सरकार निर्माण करु – राष्ट्रवादी

- Advertisement -

 

भाजपनंतर राज्यपालांनी आघाडीला आमंत्रण द्यावे – देवरा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रामार्फत भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. भाजपने ते आमंत्रण स्वीकारत सत्ता स्थापन केली तर विधानसभेत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यामुळे ‘जर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर राज्यपालांनी महाआघाडीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण द्यावे आणि जर शिवसेनेने महाआडीला पाठिंबा दिला तर सत्ता स्थापनेचा आम्ही विचार करु’, असे मिलिंद देवरा म्हणाले आहेत.

- Advertisement -

जयपूरमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक

काँग्रेसने आपले सर्व आमदार जयपूरला पाठवले आहेत. सत्ता स्थापनेसाठी कर्नाटक सारखा घोडेबजार होऊ नये, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्व आमदारांची रवानगी जयपूर येथील एका हॉटेलमध्ये केली आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? या मुद्द्यावरुन आज जयपूरमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आमदारांशी चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -