घरमुंबईमहाआघाडीबाबत शिवेसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही - शरद पवार

महाआघाडीबाबत शिवेसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही – शरद पवार

Subscribe

सत्ता स्थापनेबाबत महाआघाडीविषयी शिवसेनेकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

महाआघाडीबाबत शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असे राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. भाजपला सत्तेपासून दूर सारण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरु होती. काँग्रेसने आपले सर्व आमदार जयपूरला पाठवले आहेत. या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज पक्षश्रेष्ठींसोबत बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? या विषयावर चर्चा झाली. या चर्चेतून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याची चर्चा सुत्रांकडून मिळत होती. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानातून बाहेर पडत असताना पत्रकारांनी गाठले आणि याविषयी प्रतिक्रिया मागितली. तेव्हा शरद पवार यांनी आपल्याला शिवसेनेकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे म्हटले.


हेही वाचा – शिवसेनेने पाठिंबा दिल्यास आम्ही सत्ता स्थापन करू – काँग्रेस

- Advertisement -

राज्यात सत्ता स्थापन कोण करणार?

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास १६ दिवस झाले, मात्र अध्यापही सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. आज राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. काँग्रेसची जयपूर येथे शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? या विषयावर चर्चा सुरु होती. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील आमदारांसोबत बैठक झाली. भाजपला शनिवारी राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. याच निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर संध्याकाळी चार वाजता पुन्हा बैठक होणार असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. याशिवाय राज्यपालांच्या निमंत्रणाला या बैठकीनंतर उत्तर देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप काय करेल? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -