घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवार आणि मुख्यमंत्री दिल्लीत

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवार आणि मुख्यमंत्री दिल्लीत

Subscribe

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन साधारणत: दोन आठवडे होत आले. मात्र, राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच काही केल्या सूटताना दिसत नाही. निवडणुकीपुर्वी शिवसेना आणि भाजपने युती जाहीर केली होती. मात्र, निकालानंतर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद टोकाला गेले आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही बडे नेते दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींकडे पाहता सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस आणखी वाढत चालला आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसले आहेत. दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. या घडामोडींकडे पाहता जर खरच शिवसेना आणि भाजप युती तुटली आणि आघाडीने शिवसेनाला पाठिंबा दिला तर महाराष्ट्रात खुप मोठा आणि ऐतिहासिक राजकीय भूकंप होईल, असे म्हणायला हरकत नाही. कारण एकीकडे राष्ट्रवादी विरोधी बाकावर बसण्यावर ठाम असल्याचे म्हणत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेनेला पाठिंबा द्यावा का? या मुद्द्यावरुन आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. याशिवाय शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी करत भाजप शिवाय सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

हेही वाचा – ‘जय महाराष्ट्र’, संजय राऊतांनी पाठवला अजित पवारांना एसएमएस; सत्ता स्थापनेत आणखी एक ट्विस्ट

- Advertisement -

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक

शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. रविवारी संध्याकाळी शरद पवार दिल्लीत दाखल झाले. आज त्यांची सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? या विषयावर चर्चा होणार आहे. शनिवारी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाशी सोनिया गांधी यांची बैठक झाली. या बैठकीनंतर आता शरद पवार यांच्या सोबत त्यांची बैठक होणार आहे. सोनिया गांधी पक्षातील नेत्यांपेक्षा शरद पवार यांच्या मताला जास्त महत्त्व देत असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीत महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधीत मोठा निर्णय होऊ शकतो. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला रवाना होत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री आज अमित शहांची भेट घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते अमित शहा यांच्यासोबत राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाचे बोलणार आहेत. या बैठकीत जर शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी होकार दिला तर युती अबाधित राहण्याचे संकेत आहेत. मात्र, भाजप इतक्या सहजासहजी मुख्यमंत्री पद देणे शक्य नसल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. याशिवाय महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाअधिक मदत मिळावी या मागणीसाठी देखील ते दिल्लीत गेले असल्याचे समजते आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘बाळासाहेब ठाकरे हयात असते तर’, भाजप-सेना वादात रोहित पवारांचा तडका

महाराष्ट्रात खरच राष्ट्रपती राजवट लागू होणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन साधारणत: दोन आठवडे होत आले. मात्र, राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच काही केल्या सूटताना दिसत नाही. निवडणुकीपुर्वी शिवसेना आणि भाजपने युती जाहीर केली होती. मात्र, निकालानंतर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद टोकाला गेले आहेत. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसले आहेत. भाजपला या निवडणुकीत सर्वाधित म्हणजे १०५ जागांवर तर शिवसेनेला ५६ जागांवर यश आले. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज भासणार आहे. मात्र, सत्ता स्थापनेपेक्षा दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद जास्त महत्त्वाचे वाटत आहे. आता शिवसेनेने देखील सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. येत्या ९ नोव्हेंबरला विद्यमान राज्य सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ९ नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापनेचा पेच सुटला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हे आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -