घरदेश-विदेशभागवतांना दहशतवादी, योगींना रेपिस्ट म्हणणाऱ्या गायिकेविरोधात गुन्हा दाखल

भागवतांना दहशतवादी, योगींना रेपिस्ट म्हणणाऱ्या गायिकेविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

हार्ड कौरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो शेअर करुन त्यांना 'रेपिस्ट' आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो शेअर करुन त्यांना 'दहशतवादी' म्हटले होते.

सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह्य पोस्ट करणाऱ्या पंजाबी गायिका हार्ड कौरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गायिका तरुण कौर ढिल्लन उर्फ हार्ड कौरने १८ जून रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो शेअर करुन त्यांना ‘रेपिस्ट’ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो शेअर करुन त्यांना ‘दहशतवादी’ म्हटले होते. हार्ड कौरच्या या पोस्टमुळे तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हार्ड कौरविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

याप्रकरणी हार्ड कौर हिच्याविरोधात वाराणसीच्या कैन्ट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील शशांक त्रिपाठी यांनी कैन्ट पोलीस ठाण्यात हार्ड कौरविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हार्ड कौरची इंस्टाग्राम पोस्ट ही जनतेच्या भावना दुखावणारी आहे. शशांक यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हार्ड कौरविरोधात १२४ए (देशद्रोही), १५३ए (धर्माच्या आधारावर लोकांच्या भावनांना ठेस पोहचवणे आणि भेदभाव करणे), ५०० (मानहानी), ५०५ (सार्वजनिक गैरवर्तनाला जबाबदार असलेले वक्तव्य करणे) आणि ६६ आईटी अॅक्टनुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

हार्ड कौरने सरसंघचालक मोहन भागवत यांना फक्त जातियवादी म्हटले नाही तर. देशामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसारख्या घटनांना ते आणि त्यांची संघटना आरएसएसला जबाबदार ठरवले आहे. तो २६/११ चा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला असो तसंच पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेला हल्ला असो. तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘रेपिस्ट’ असे म्हटले आहे. हार्ड कौरने याआधी देखील अनेक सेलिब्रिटी आणि राजकिय नेत्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हार्ड कौर यांनी आता मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्याविरोधत केलेल्या आक्षेपार्ह्य पोस्टवरुन तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले आहे. हार्ड कौरने आपल्या पोस्टमध्येच शिव्या दिल्या नाहीत तर ज्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे त्यांना देखील तिने शिव्या दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -