घरमहाराष्ट्रनाशिकमुसळधार पाऊस, तरीही जायकवाडी तहानलेलंच

मुसळधार पाऊस, तरीही जायकवाडी तहानलेलंच

Subscribe

नगर जिल्ह्यात निळवंडे आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची कृपादृष्टी, मात्र गोदावरीसह प्रवरातील कोरड्या बंधार्‍यांमध्ये पाणी अडल्याने परिस्थिती कायम

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, निफाडमध्ये झालेल्या पावसाने नदी-नाल्यांना पाणी वाढलेले होते, त्यामुळे गोदावरी, दारणा, वालदेवी, वाघाडी, नासर्डी या नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढलेली होती. तर नगर जिल्ह्यात निळवंडे आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाल्याने धरणांच्या पुढील भागातील नाल्यांचे पाणी प्रवरा नदीपात्रात वाहत होते. मात्र, हे पाणी जायकवाडीत भर घालणारे ठरले नाही. कारण दोन्ही नदीपात्रात असलेल्या बंधार्‍यांमध्ये पाणी आडले गेले आहे, असे जायकवाडी धरणाच्या अधिकार्‍यांनी माहिती देताना सांगितले.

नाशिक जिल्ह्यातून गोदावरी पात्रातून आणि प्रवरापात्रतून पाण्याचा विसर्ग प्रवाहीत होताना त्या पाण्याचे प्रमाण, विसर्गाचे क्युसेक आकडेवारी यावर धरणात साठा होण्यास लागणारा कालावधी ठरतो. त्यामुळे जायकवाडीकडे जाणार्‍या पाण्याचा प्रवास 2 ते 4 दिवस ठरतो. काल सुमारे 691 मिलीमीटर पाऊस झाला होता. नांदूरमध्यमेश्वरमधून काल दूपारपर्यंत 26 हजार क्युसेक आणि सायंकाळी 28 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्याचबरोबर पुढे नदीपात्रात याच पाण्यात इतर उपनद्या, नाल्यांचे पाणीही येऊन मिळत होते. त्यामुळे जायकवाडीकडे किती पाणी प्रवाहीत होते, याकडे जायकवाडी धरणाचे अभियंते लक्ष ठेवून होते.

- Advertisement -

नाशिकमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्याचा जलसाठा 7 टक्क्यांवरून 14 टक्के झालेला आहे. त्याचबरोबर गंगापूर धरण 34 टक्के, दारणा 38, भावली 39 आणि मुकणे 12 टक्के भरलेले आहे. या सर्व धरणांतून होणारा विसर्ग आणि गोदावरी, कादवा, दारणा या नद्यातून होणारा विसर्ग नांदूरमध्यमेश्वर धरणात होतो. काल नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून 27 हजार 980 क्युसेक पाणी विसर्ग करण्यात येत होते. नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांनी तळ गाठलेला आहे. तर सर्व नद्यांचे पात्र कोरडेठाक पडलेले होते. पावसाने सुमारे महिनाभर हुल दिल्याने धरणे आणि नदीपात्रांना प्रतिक्षाच होती. पण गेल्या आठवड्यात शुक्रवारपासून पावसाने सलग तीन तीवस हजेरी लावल्याने नाशिकमधील पश्चिम भागातील धरणे, उपनद्या, नाले पाण्याने भरलेली होती. पूर्व भागातील करंजवण, पालखेड, गिरणा, चणकापूर, ओझरखेड या धरणांमध्ये पाण्याची भर पडलेली नाही. त्यामुळे नाशिकला मुसळधार पाऊस होत असला तरी धरण, बंधारे आणि नदीपात्रांची पाण्याची तहान एवढी मोठी आहे, की ती भागल्याशिवाय जायकवाडी धरणांकडे नैसर्गिकरित्या पाणी प्रवाहीत होऊ शकणार नाही, असे जलतज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते.

पात्रातील बंधार्‍यांमध्ये पाणी

नाशिक ते जायकवाडी धरण दरम्यान गोदावरीच्या नदीपात्राची लांबी सुमारे 200 किलोमीटर  आहे. या पात्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड तालुके नगर जिल्ह्यातील कोपरगाव औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात बंधारे आहेत. या बंधार्‍यांमध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पिण्याच्या पाण्याची साठवणुक होते. किंवा पात्रात पाणी शिल्लक असावे, म्हणून साठवण केलेली असते. उन्हाळ्यात ही बंधारे कोरडीठाक पडलेली होती. तशीच स्थिती नगरजिल्ह्यातील प्रवरानदीच्या पात्रात होती. त्यामुळे आता झालेल्या पावसाचेपाणी प्रथम या पात्रातीत बंधार्‍यात सामावले आहे, असे जायकवाडी धरणाचे कनिष्ठ अभियंता गवांदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -