घरदेश-विदेशबंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याचे आदेश

बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याचे आदेश

Subscribe

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याचे आदेश दिले आहेत. आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

काँग्रेस- जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना आज सुप्रीम कोर्टाने आमदारांना कर्नाटक विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांना भेटून राजीनामा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आमदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कर्नाटक पोलिसांना योग्य व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे.

विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याचे आदेश

कर्नाटकात सुरु असलेले राजीनामे नाट्य सुप्रीम कोर्टात धडकले होते. बंडखोर आमदारांपैकी एका आमदाराने कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. रमेश कुमार आमचा राजीनामा स्वीकारत नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने या आमदारांना पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे आपण राजीनामे का देत आहोत? या संदर्भात आपली बाजू मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

- Advertisement -

 १३ पैकी ८ आमदारांचे राजीनामे अपात्र

विधानसभाचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना दिलेल्या पत्रात १३ पैकी ८ आमदारांचे राजीनामे अपात्र असल्याचे म्हटले आहे. शिवाय यापैकी एकही आमदाराने भेटीसाठी वेळ मागितलेला नाही. ज्यांना कुणाला मला भेटायचे आहे, त्यांच्यासाठी मी कार्यालयात उपस्थित आहे, असे रमेश कुमार म्हणाले आहेत. रमेश कुमार यांच्या या भूमिकेनंतर सुप्रीम कोर्टाने सर्व आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांकडे जाण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘शिवकुमार गो बॅक’; कर्नाटकच्या राजकीय नाट्याला वेगळे वळण

हेही वाचा – कर्नाटकमधील अस्थिरतेला जबाबदार कोण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -