घरदेश-विदेशअमान्य!!काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्राचा अहवाल लष्कराने फेटाळाला

अमान्य!!काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्राचा अहवाल लष्कराने फेटाळाला

Subscribe

लष्कराने देखील आता संयुक्त राष्ट्राने दिलेला अहवाल टीका करत फेटाळून लावला आहे. काश्नमीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली सुरू असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्राने दिलेला अहवाल आता भारतीय लष्कराने देखील फेटाळून लावला आहे. काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्राने दिलेला अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे. शिवाय, या अहवालाकडे लक्ष देण्याची गरज नसून संपूर्ण अहवाल हा हेतुता बनवला गेला असल्याचे बिपीन रावत यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीरमध्ये भारतीय सैनिक उत्तमरितीने कर्तव्य बजावत असून या अहवालामुळे दहशतवाद्यांना प्रेरणा मिळाल्याचे देखील रावत यांनी स्पष्ट केले आहे. जम्मू – काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्राने दिला होता. त्यावरून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालावर टीका केली होती. लष्कराने देखील या अहवाल फेटाळून लावला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालावर देशभरातून टीका झाली आहे.

काय म्हटले आहे अहवालामध्ये

संयुक्त राष्ट्रसंघाने जम्मू – काश्मीरप्रश्नी अहवाल दिला असून जम्मू – काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तसेच ठार केलेला दहशतवादी बुरहान वाणीसह भारतीय लष्कराच्या कारवाईवरती देखील चर्चा करण्यात आली आहे. नागरिकांचे अपहरण, हिंसा आणि हत्यांसारख्या वाढत्या घटना या गंभीर आहेत. यावरून जम्मू – काश्मीरमध्ये मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. असे या अहवालामध्ये म्हटले आहे. आता लष्कराने देखील अहवालामध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

सरकारची अहवालावर टीका

दरम्यान, संयुक्त राष्टसंघाच्या अहवालावर सरकारने देखील टीका करत अहवाल फेटाळून लावला आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा अहवाल काल्पनिक, पक्षपाती आणि चुकीच्या माहिती अधिकारावर बनवला गेला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने देखील संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल हा पुर्वग्रहदुषित आणि हेतुता प्रेरित असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता लष्कराने देखील या अहवालावर ताशेरे ओढत अहवाल फेटाळून लावला आहे.

जम्मू -काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवाया

जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत आहेत. शिवाय पाकिस्तान देखील वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. रमजान महिन्यामध्ये लागू केलेली शस्त्रसंधी उठवल्यानंतर लष्कराने ऑपरेशन ऑल आऊटच्या माध्यमातून अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवादी  कारवाई आणि पाकड्यांकडून सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सामान्य नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. नुकतीच पत्रकार सुजात बुखारी यांची देखील दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. शिवाय, रमजान निमित्ताने घरी जाणाऱ्या औरंगजेब या भारतीय जवानाची देखील दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -