घरटेक-वेकWi-Fi यंत्रणेला अखेर १० वर्षांनी 'सिक्युरिटी अपडेट'

Wi-Fi यंत्रणेला अखेर १० वर्षांनी ‘सिक्युरिटी अपडेट’

Subscribe

वाय-फाय वापरणाऱ्या तमाम युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. वाय-फाय यंत्रणेला तब्बल १० वर्षांनतर अखेर सिक्युरिटी अपडेट मिळाला आहे.

वाय-फाय यंत्रणा अब्जावधी लोकांच्या जीवानाचा एक अविभाज्य घटक बनली आहे. घर असो वा ऑफिस वाय-फायचा वापर सर्रास सगळीकडे केला जातो. आता तर बहुतांशी रेल्वे स्टेशन्सवरही मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे वाय-फाय प्रणालीची सुरक्षा वेळोवेळी अपडेट करणं तितकंच महत्वाचं आहे. वाय-फाय सुरक्षित असेल तरच लोक त्याचा खासगी अथवा व्यावसायिकदृष्ट्या त्याचा बिनाधस्तपणे वापर करु शकतात. आजच्या काळात इतक्या महत्वाच्या ठरलेल्या या वाय-फाय यंत्रणेला अखेर सुरक्षा अपडेट मिळाला आहे. त्यामुळे आता वाय-फाय अधिक सुरक्षित झालं आहे.

 WP2 वरुन आता WP3 वर…

सगळ्या डिव्हाईसना कनेक्ट होणारं वाय-फाय नेटवर्क आजवर ‘WP2’ या सिक्युरिटी प्रोटोकॉलनुसार वापरलं जात होतं. गेल्या अनेक वर्षांपासून वाय-फायसाठी WP2 हीच सुरक्षाप्रणाली वापरली जात होती. मात्र यामध्ये अखेर सुधारणा करण्यात आली असून आता ‘WP3’ ही नवी सुरक्षा प्रणाली वाय-फायसाठी वापरली जाणार आहे. यापुढे वाय-फाय WP3 याच सुरक्षा प्रणालीच्या प्रोटोकॉलनुसार चालेल. WP2 ते WP3 या अपग्रेडेशनसाठी एकूण १० वर्षांचा कालावधी लागला असून अखेर ही प्रणाली जारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

WP3 सुरक्षा प्रणालीचा फायदा काय?

WP3 सुरक्षा प्रणालीमुळे ‘हॅकिंग’वर खूप मोठ्या प्रमाणात आळा बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही सुरक्षा यंत्रणा आधीच्य यंत्रणेपेक्षा अधिक सतर्क आणि सक्षम आहे. त्यामुळे हॅकर्सना वाय-फायचा पासवर्ड हॅक करणं आता कठीण होणार आहे. WP3 यंत्रणेमध्ये सुरक्षेचे स्तर काही पटीने वाढवण्यात आले आहे. यामुळे हॅकर्स सहजासहजी नेटवर्त हॅक करु शकणार नाहीत. जुन्या WP2 प्रणालीमध्ये आपोआपच हे अपग्रेडेशन झालं आहे. दरम्यान या प्रणालीचे ‘WPA3-पर्सनल’ आणि ‘WPA3-एंटरप्राईस’ या २ प्रमुख प्रकारात विभाजन करण्यात आलं आहे. व्यावसायिक आणि खासगी वापराच्या दृष्टीकोनातून हे वर्गीकरण करण्यात आल्याचं समजतं आहे.

हेही वाचा : नेटवर्क नाही? मग करा ‘WIFI’ कॉल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -