घरमुंबईकल्याणमधील स्कायवॉकच्या तुटलेल्या छताला प्लास्टीक कापडाचा आधार

कल्याणमधील स्कायवॉकच्या तुटलेल्या छताला प्लास्टीक कापडाचा आधार

Subscribe

कल्याणमधील स्कायवॉकवर फेरीवाले बसत असल्याने त्यांच्या अंगावर पावसाचा अभिषेक होऊ नये यासाठी त्यांनी चक्क छताला प्लास्टीक कापडाचा आधार दिला आहे.

ज्या स्कायवॉकवरून दररोज लाखो प्रवासी ये जा करतात…, त्या स्कायवॉकची अवस्था पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. स्कायवॉकच्या छताचे पत्रेच तुटल्याने पावसाचा अभिषेक प्रवाशांच्या अंगावर पडत आहे. मात्र स्कायवॉकवर फेरीवाले बसत असल्याने त्यांच्या अंगावर पावसाचा अभिषेक होऊ नये यासाठी त्यांनी चक्क छताला प्लास्टीक कापडाचा आधार दिला आहे. त्यामुळे केडीएमसीच्या कारभारावर प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर असून, हेच स्मार्ट कल्याण का?, असा संतप्त सवाल प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.

स्कायवॉकची दुरवस्था 

कल्याण रेल्वे स्थानकातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पश्चिमेकडील बाजूस एमएमआरडीएच्या माध्यमातून स्कायवॉक उभारण्यात आला आहे. या स्कायवॉकचा वापर दररोज लाखो प्रवासी करतात. सध्या स्कायवॉकची अवस्था खूपच बिकट झाल्याची दिसून येते. स्कायवॉकवरील फेरीवाल्यांचा त्रास प्रवाशांना नेहमीच सहन करावा लागतोच. त्या गर्दीतूनच प्रवाशांना मार्गक्रमण करावे लागते. ऐन पावसाळ्यात स्कायवॉकच्या छताचे पत्रेही तुटले आहेत. त्या तुटलेल्या छतातून पावसाचा अभिषेक स्कायवॉकच्या आतमध्ये पडत असतो. त्यामुळे स्कायवॉकवरून चालणेही प्रवाशांना कठीण होऊन बसले आहे. मात्र काही ठिकाणी फेरीवाले आपला व्यवसाय करत असल्याने त्यांनी चक्क आपल्या सोयीसाठी तुटलेल्या छताला प्लास्टीकच्या कापडाचा आधार देत आडोसा तयार केला आहे. तसेच स्कायवॉकवर भिकारी आणि गुर्दल्लयांचा वावर असल्याने अस्वच्छता पसरलेली असते. स्कायवॉकवरील लाद्याही उखडल्या आहेत. तसेच स्टीलच्या रेलींग तुटून पडले आहेत. प्लास्टीक शीटला आगीला लागण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. मात्र याकडं पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे सपेशल दुर्लक्ष झाल्याचेच दिसून येत आहे.

- Advertisement -

स्कायवॉकचे स्ट्रक्चर ऑडीट करण्याची सुचना

स्कायवॉक उभारून जवळपास ११ वर्षे झाली आहेत. पुलाबाबत कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी स्कायवॉकचे स्ट्रक्चर ऑडीट करण्याची सुचना पालिका आयुक्तांकडून करण्यात आली होती. त्यानुसार मध्यतंरीच्या काळात मुंबई आयआयटीकडून स्कायवॉकचे स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आले. मात्र याबाबतचा अहवाल पालिकेकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळेच स्कायवॉक दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे. अहवाल आल्यानंतर आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या तातडीने केल्या जाणार आहेत, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा –

वरळी सी-लिंकवरून त्याने मारली उडी

- Advertisement -

गर्भवती विवाहितेची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -