घरदेश-विदेशएक कप कॉफीला मोजावे लागतात लाखभर रूपये!

एक कप कॉफीला मोजावे लागतात लाखभर रूपये!

Subscribe

व्हेनेझुएलामध्ये एका कॉफीची किंमत १ दशलक्ष बॉलिव्हर्स इतकी आहे. सध्या तिथल्या महागाईनं कळस गाठला आहे.

डोकं दुखलं की, सहज आपण चहा किंवा कॉफी पिऊया म्हणतो. पण या एका कॉफीची किंमत जर लाखाच्या घरात असेल तर? कॉफी प्यायची की नाही असा मोठा प्रश्न नक्कीच पडेल ना?  अर्थात तुम्ही घाबरून जाऊ नका. ही परिस्थिती भारतात उद्भवलेली नाही. तर सध्या व्हेनेझुएलामधील करॅकसमध्ये एका कॉफीची किंमत १ दशलक्ष बॉलिव्हर्स इतकी आहे. व्हेनेझुएलामधील महागाई इतकी वाढीला लागली आहे की, सध्या तिथे लोकांना एका कॉफीसाठीदेखील प्रचंड प्रमाणात पैसे मोजावे लागत आहेत.

काय आहे परिस्थिती?

ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, दोन वर्षापूर्वी याच कॉफीची किंमत साधारण ४५० रुपये इतकी होती. मात्र आता महागाईनं कळस गाठला आहे. याबाबतचा चार्टदेखील ब्लूमबर्गनं दिला आहे. आजची किंमत ही किमान वेतनाच्या साधारण एक – पंचमांश समतुल्य आहे. एक साधा कप खरेदी करण्यासाठी १०० बॉलिव्हर नोट वापरावी लागते. तर कॉफी पिण्यासाठी अशा १० हजार बॉलिव्हर नोटा तुम्हाला तुमच्याजवळ ठेवणं सध्या भाग पडत आहे. शिवाय या १ दशलक्ष बॉलिव्हरलादेखील काहीच किंमत नसल्याचं चित्र आहे. बॉलिव्हर डॉलरमध्ये कन्व्हर्ट केल्यास, त्याची किंमत केवळ २९ सेंट इतकीच येत आहे. गेल्या आठवड्यात ८,००,००० बॉलिव्हर्सची वाढ झाली असून व्हेनेझुएलामध्ये गेल्या १२ महिन्यांमध्ये चलनवाढीचा दर हा ४३,३७८ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. त्यामुळं ही अतिशय चिंतेची बाब असून महागाई साधारण ४,८२,१५३ टक्के इतकी वाढली आहे. त्यामुळं तिथली लोक कशा प्रकारे या महागाईला सामोरी जात आहेत ही एक प्रकारे चिंतेचीच बाबच आहे.

ratio
सौजन्य – ब्लूमबर्ग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -