घरमुंबईबेस्ट होणार कर्जमुक्त; महापालिकेकडून कोट्यावधींचे अनुदान

बेस्ट होणार कर्जमुक्त; महापालिकेकडून कोट्यावधींचे अनुदान

Subscribe

बेस्ट कर्ज फेडण्यासाठी महापालिकेने ११३६ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान दिले आहे. आतापर्यंत महापालिकेच्यावतीने बेस्टला एकूण १७३६ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

तोट्यातील बेस्ट उपक्रमाला ६०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महापालिका उपक्रमाला कर्ज फेडण्यासाठी ११३६ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देणार आहे. या निर्णयामुळे बेस्ट आता कर्जमुक्त होणार आहे. तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी महापालिकेने तातडीच्या, मध्यम व दिर्घ कालावधीच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यास सांगितला होता. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमास आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली होती.

…म्हणून महापालिकेने दिले ११३६ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान

आराखडयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनात भाडेतत्वावरील बसेसची खरेदी आणि तिकीट बस भाडे कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने बेस्टला ६०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याची तयारी दर्शवली. याला महापालिकेची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर २५ जुन रोजी २०० कोटी रुपये तर १२ जुलै रोजी १०० कोटी रुपये देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरीत ३०० कोटी रुपयांचे अनुदान टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. बेस्टकडे अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेडीची ११३६.३१ कोटी रुपये एवढी आहे. बेस्टने हे कर्ज वार्षिक ९ ते ११ टक्के या दराने काढलेले आहे. या कर्जावरील व्याजापोटी बेस्ट उपक्रमावर मोठ्या प्रमाणावर व्याजापोटी आर्थिक भार पडत आहे: त्यामुळे कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. कर्जाची परतफेड केल्यास व्याजाचा बोजा कमी होवून महसुली खर्चात बचत होईल आणि त्यामुळे दैनंदिन खर्च भागवणे बेस्ट उपक्रमाला सुकर होईल, असे बेस्ट महाव्यवस्थापकांनी महापालिकेला पत्र पाठवून कळवले आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड त्वरीत करण्यासाठी त्यांना ११३६.३१ कोटी रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

- Advertisement -

बेस्ट कर्जमुक्त होईल; अधिकाऱ्यांचा दावा

महापालिकेने यापूर्वी बेस्टला १६०० कोटी रुपयांचे कर्ज व्याजी दिले होते. आता बेस्टवर असलेले कर्ज फेडता यावे म्हणून बिनव्याजी ११३६.३१ कोटी रुपये अतिरिक्त अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे स्थायी समितीची मान्यता प्राप्त होताच बेस्टला ही रक्कम दिली जाईल आणि बेस्ट कर्जमुक्त होईल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

बेस्टला आतापर्यंत करण्यात आलेली आर्थिक मदत

२०१४-१५ मध्ये १५० कोटी रुपये
२०१५-१५ मध्ये सानुग्रह अनुदान देण्यासाठी २५ कोटी रुपये
२०१६-१७ मध्ये नवीन बसेस खरेदी करण्यासाठी १०० कोटी रुपये
२०१७-१८ मध्ये १३.६९ कोटी रुपये
२०१८-१९ मध्ये १४.५६ कोटी रुपये
२०१९-२० मध्ये १३९. २० कोटी रुपयांची तरदतूद
२५ जून २०१९ रोजी २०० कोटी रुपये
१२ जुलै २०१९ रोजी १०० कोटी रुपये

- Advertisement -

बेस्टमध्ये लवकरच १२५० एसी बसेस

र् बेस्टने भाडे कपात करत मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. बेस्टचा प्रवास स्वस्त केल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी लवकरच ५०० एसी मिनी, ५०० एसी मिडी आणि २५० एसी मिडी इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात सामील होणार आहेत. यासाठी वर्कऑर्डर देण्यात आली आहे, अशी माहिती सोमवारी बेस्ट मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र कुमार बागडे यांनी दिली.

बेस्टच्या प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी खासगी तत्वावर ४०० एसी मिनी बसेस बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वातर येणार आहेत. त्याच बरोबर या व्यतिरिक्त बेस्टमध्ये ५०० एसी मिनी, ५०० एसी मिडी आणि २५० एसी मिडी इलेक्ट्रिक बसेस अशा एकूण १२५० बसेस बेस्टच्या ताफ्यात येणार आहेत. सोबतच केंद्र सरकारच्या सबसिडीमधून ज्या ८० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील १० बसेस लवकरच येणार असून त्या धारावी डेपोत उभ्या केल्या जाणार असल्याचे बागडे यांनी स्पष्ट केले. या बसेस लवकरच मुंबईकरांसाठी रस्त्यावर धावतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय वन नेशन वन कॉर्डचा पायलेट प्रकल्प नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून काही बसेसमध्ये राबविला जाणार आहे.


हेही वाचा – चिल्लरचे ओझे बेस्ट वाहकांच्या खिशांवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -