घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडच्या महापौरांचा हवेत गोळीबार?

पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचा हवेत गोळीबार?

Subscribe

पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम नागरिक महापौर राहुल जाधव यांनी पवना धरण पाणलोट क्षेत्रात पिस्तूलातून हवेत गोळीबार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम नागरिक महापौर राहुल जाधव यांनी पवना धरण पाणलोट क्षेत्रात पिस्तूलातून हवेत गोळीबार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, या प्रकरणी आपण असे काही केलं नसल्याचे महापौर राहुल जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणावर आज जल पूजनाचा कार्यक्रम होता. त्यामुळे महापौरसह अनेक कार्यकर्ते त्याठिकाणी उपस्थित होते. सपत्नीक महापौर राहुल जाधव यांनी जलपूजन केले. त्यानंतर पवना धरण परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवन करून काही कार्यकर्त्यांसह महापौर बाहेर आले आणि जवळ असलेली नवीन पिस्तुल काढून दाखवत हवेत दोन गोळ्या झाडल्या. दरम्यान या घटनेनंतर सर्व महापौर यांच्या दिशेने धावत आले, हे पाहून महापौर यांची भंबेरी उडाली. काही महिन्यापूर्वीच महापौर यांना पिस्तूलाचा परवाना मिळाला असून आज त्यांनी हवेत गोळीबार केला. या घटनेचा एक फोटो व्हायरल झाला असून त्यात महापौर हातात पिस्तुल घेऊन दिसत आहेत. तर शेजारील कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. जल पूजनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले हे देखील उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे रात्री उशिरा निधन झाले असून सर्व स्थरातून शोककळा व्यक्त केली जात असताना भाजपाच्या महापौर असलेले राहुल जाधव यांनी नवीन पिस्तूलातून गोळीबार करणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न मात्र सर्व स्तरातून उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -