घरमहा @२८८कामठी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ५८

कामठी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५८

Subscribe

नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा (विधानसभा क्र. ५८) मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो.

कामठी विधानसभा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात आहे. या शहराची स्थापना १८२१ साली झाली होती. सुरुवातीला या शहराचे नाव ‘कॅम्ट टू’ असे होते. त्यानंतर त्याचे अपभ्रंश कामठी असे झाले. २०११ च्या जनगननेनुसार कामठी विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या २ लाख ३८ हजार ८७० इतकी आहे. हा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.

मतदारसंघ क्रमांक – ५८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,९७,१३०
महिला – १,८०,४५९
एकूण मतदार – ३,७७,५९१

- Advertisement -

विद्यमान आमदार – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

chandrashekhar bawankule
चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या कामठी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. बावनकुळे हे कामठीतील मोठे नाव आहे. त्यांचे राजकीय आणि सामाजिक काम मोठे आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला आहे. त्याचबरोबर आंदोलनांमुळे त्यांना बऱ्याचदा अटक करण्यात आली आहे. १९९५ ते १९९९ साली ते भारतीय जनता पक्षाच्या युवा भारतीय संघटनेचे उपाध्यक्ष होते. १९९९ ते २००१ ते भाजपचे नागपूर जिल्हा सचिव होते. २००४ साली त्यांनी पहिंल्यादा कामठी मतदारसंघातून भाजप पक्षाकडून उमेदवारी लढवली होती. त्यांचा विजय झाला. यानंतर २००९ आणि २०१४ साली देखील त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि त्यांचा विजय झाला होता. याशिवाय ते ५ डिसेंबर २०१४ पासून ऊर्जा व नवीन व नवीकरण ऊर्जा खात्याचे मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) चंद्रशेखर बावनकुळे, भाजप – १,२६,७५५
२) राजेंद्र मुळक, काँग्रेस – ८६,७५३
३) तापेश्वर वैद्य, शिवसेना – १२,७९१

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -