घरमुंबईमुलुंडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू

मुलुंडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू

Subscribe

मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर झाड कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर झाडाची फांदी पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा रिक्षावर झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले?

मुलुंड पश्चिम येथील एन. एस. रोडवर असलेल्या एका रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अशोक आनंदराव शिंगरे (४५) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना एम.टी. अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तर वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या राजेश इराना भंडारी (२९) यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -