घरमहा @२८८सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १७९

सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १७९

Subscribe

सायन-कोळीवाडा (विधानसभा क्र. १७९) हा मुंबई शहरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मुंबई शहरातल्या दक्षिण मध्य मुंबईतला हा एक मतदारसंघ आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत यातल्या ६ मतदारसंघांपैकी फक्त सायन-कोळीवाडामध्येच भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. कोळी वसाहती असलेल्या या भागाच्या नागरी समस्या या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. इथल्या कोळी बांधवांसाठी पर्ससीन नेटचा मुद्दा महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर २०१४मध्ये काँग्रेसच्या जगन्नाथ शेट्टी यांचा पराभव करत भाजपच्या तामिल सेल्वन आमदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात एकूण २७४ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १७९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४५,१२३
महिला – १,०९,००५

- Advertisement -

एकूण मतदार – २,५४,१६३


TAMIL SELVEN
तमिल सेल्वन

विद्यमान आमदार – कॅ. तमिल सेल्वन, भाजप

२०१४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जगन्नाथ शेट्टी यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव करत तमिल सेल्वन आमदार झाले. २०१२मध्ये ते मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये पालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्याच कामगिरीच्या जोरावर पक्षाने त्यांना २०१४मध्ये तिकीट दिलं. पक्षाच्या विश्वासाला सार्थ ठरत त्यांनी शिवसेनेच्या मंगेश सातमकर यांचा साडेचार हजार मतांनी पराभव केला.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) कॅ. तमिल सेल्वन, भाजप – ४०,८६९
२) मंगेश सातमकर, शिवसेना – ३७,१३१
३) जगन्नाथ शेट्टी, काँग्रेस – २३,१०७
४) प्रसाद लाड, राष्ट्रवादी – ११,७६९
५) मनोज संसारे, अपक्ष – ६७१६

नोटा – १४५७

मतदानाची टक्केवारी – ५२.७३ %


हेही वाचा – मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -