घरमुंबईपालिकेच्या दुर्लक्षामुळे साडे चार एकराचे खेळाचे मैदान मुंबईकर गमावणार

पालिकेच्या दुर्लक्षामुळे साडे चार एकराचे खेळाचे मैदान मुंबईकर गमावणार

Subscribe

माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांचा पालिकेवर थेट आरोप. सदर भूखंड पालिकेने ताब्यात घ्यावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे साडे चार एकराचे खेळाचे मैदान गमावण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे. उपनगरातील बोरिवली पूर्व परिसरातील हा आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिकेने तब्बल १४ वर्षे टाळाटाळ केली, असा थेट आरोप बोरीवलीचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी केला आहे. तसेच पालिकेना हा भूखंड ताब्यात घ्यावा अशी मागणी येथील स्थानिक करत आहेत.

जमिनीच्या भूसंपादनाचा नवा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात

बोरिवली पूर्वेच्या मागाठाणे गावातील सिटीएस नंबर १७७, १७७/१, १७७/२, १७७/३ या भूखंडाचे मालक मेसर्स गार्डन सिक्युरिटीज अँड प्रॉपर्टीज एलएलपी, यांनी ऑक्टोबर २००४ मध्ये या भूखंडाच्या खरेदीसाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला नोटीस बजावली. एमआरटीपी ऍक्ट, १९६६च्या कलम १२७ अन्वये बजावण्यात आलेल्या या नोटीसीनुसार सदर भूखंड ताब्यात घेण्यास मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार यांना १४ वर्षे अपयश आल्याने सदर भूखंडाचे आरक्षण कायद्यानुसार रद्द झाले. आरक्षण रद्द झालेले असले तरीही मुंबई महानगरपालिका, त्यांना आवश्यकता असल्यास, बोरीवलीतील हा भूखंड भूसंपादन कायद्यानुसार संपादित करून घेऊ शकते, असे २००८ मध्येच राज्य सरकारने स्पष्ट केले होते. यानुसार २०१२ मध्ये मुंबई महानगरपालिकेने भूसंपादन अधिनियमाच्या कलम ४ व ६ अन्वये सदर जमिनीच्या भूसंपादनाचा नवा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. ज्या जमिनीवर कोणत्याही सार्वजनिक उद्दिष्टाकरिता आरक्षण नाही त्या जमिनीचे भूसंपादन कलम ४ अन्वये करता येते. म्हणजेच, या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही तरीही महापालिकेस या जमिनीची आवश्यकता असल्याचे येथे सूचित होते.

- Advertisement -

हेही वाचा – ‘उडालेल्या कावळ्यांना इतर पक्षाच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते?’

स्थानिकांची भूखंड ताब्यात घेण्याची मागणी

मात्र, या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करता, जिल्हाधिकारी कार्यालयाने मे २०१७ मध्ये हा प्रस्ताव पालिकेकडे परत पाठविला. आणि २०१४ च्या नव्या भूसंपादन कायद्यानुसार नवा प्रस्ताव दाखल करण्याची सूचना केली. मात्र, पालिकेचे अधिकारी आता सुधारित भूसंपादन प्रस्ताव दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. वास्तविक, विकास नियोजन २०३४ चा आराखडा बनविणाऱ्या पालिकेच्या नगर नियोजन अधिकाऱ्यांच्या मते, बोरीवलीतील सदर भूखंड हा सब-सिटी पार्कचा भाग आहे. तसेच, पालिकेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, हा भूखंड ज्या ठिकाणी आहे, त्या आर-मध्य प्रभागात २३० हेक्टर्स मोकळ्या भूखंडांची गरज असताना अद्यापही ६३ हेक्टर्स मोकळ्या जागांची कमतरता आहे. त्यामुळे बोरिवलीकर नागरिकांसाठी आणि मुंबईच्या भल्यासाठी मुंबई महानगरपालिकेने भूखंड लवकरात लवकर ताब्यात घ्यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

“वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईत हरित आणि मोकळ्या भूखंडांची संख्या घटली आहे. अशा परिस्थितीत केवळ महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आणखी एक मोकळा भूखंड मुंबईकरांना गमवावा लागणार आहे. बोरिवली पूर्वेला दाट लोकसंख्येमुळे मोकळ्या भूखंडाची कमतरता आहे. त्यातच साडे चार एकरचा मोकळा भूखंड गमाविणे, म्हणजे प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करणे होय. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून हा भूखंड वाचवायला हवा.
शिवानंद शेट्टी, माजी नगरसेवक

- Advertisement -

खेळाचे मैदान ही येथील परिसराची गरज आहे. मुंबई महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून केवळ कागदोपत्री कामकाजाचा केला जाणारा दिखावा, ही निंदनीय बाब आहे.
नंदकुमार मोरे, स्थानिक रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -