घरमनोरंजनप्रभासचा 'साहो' जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज

प्रभासचा ‘साहो’ जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज

Subscribe

भारतात दहा हजार पडद्यांवर साहोचे दमदार आगमन होणार

बाहुबली चित्रपटाद्वारे भारतातच नव्हे संपूर्ण विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रभासचा ‘साहो’ उद्या ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शनास सज्ज झाला आहे. जवळपास दोन वर्षाच्या कालावधी नंतर प्रभासच्या चित्रपटाबाबत सिनेरसिक उत्सुक आहेत. भारतात दहा हजार पडद्यांवर साहोचे दमदार आगमन होणार आहे. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटाने भारतीय चित्रपट क्षेत्रांतील सर्व प्रस्थापित विक्रम मोडीत काढत इतिहास रचला. विशेष म्हणजे बाहुबली नंतर साहो हा प्रभासचा पहिलाच चित्रपट असून जवळपास २ वर्षाच्या कालावधीनंतर प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. साहो ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा: सुपरस्टार प्रभासची रवीना टंडन होती एक्स गर्लफ्रेंड?

साहो चित्रपटाचे टिझर, ट्रेलर आणि गाण्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. साहोमध्ये हॉलिवूड चित्रपटासारखे भरपूर ऍक्शन सीक्वेन्स असून प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यात असलेली केमेस्ट्री अचूक टिपण्यात दिग्दर्शकांना यश आले आहे. बाहुबली नंतर प्रभास एका वेगळ्याच रूपात समोर आला आहे. ट्रेलरला सिनेसमीक्षक तसेच चाहत्यांकडून सामाजिक माध्यमांवर भरगोस प्रतिसाद मिळतो आहे. साहोमध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर एका विशेष अभियानासाठी नेमलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. बाहुबलीच्या अभूतपूर्व यशानंतर साहो तेलुगू सोबतच तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे साहो चित्रपटासाठी प्रभासने हिंदीचे प्रशिक्षण घेतले असून स्वतः हिंदी भाषेतून डबिंग केले आहे.

- Advertisement -

साहो चित्रपटात प्रभाससह श्रद्धा कपूर, मंदिर बेदी, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, अरुण विजय, चंकी पांडे आणि लाल सारखे सुविख्यात अभिनेते दिसणार आहेत. साहोची निर्मिती यु व्ही क्रीएक्शन या प्रमुख निर्मिती संस्थेच्या अंर्तगत झाली असून टी सिरीज आणि अनिल थडानी यांची संस्था ए. ए फिल्म्स सुद्धा या चित्रपटात सहभागी असून दिग्दर्शन सुजीत रेड्डी यांचे आहे.


हेही वाचा: प्रभासच्या चाहत्यांच्या भेटीस ‘साहो’ चित्रपटाचा व्हिडीओ गेम

प्रभासच्या चाहत्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी ट्विटरने अनोखी भेट दिली आहे. ट्विटरने साहोसाठी विशेष इमोजी प्रसिद्ध केला आहे. इमोजी प्राप्त करणार साहो हा पहिला तेलुगू चित्रपट असणार आहे. ‘ साहो दि गेम ‘ या नावाने मोबाईल गेम तयार करण्यात आला आहे. साहोच्या टिझर प्रमाणेच मोठे ऍक्शन सिक्वेन्सचा या खेळात समावेश करण्यात आला आहे. या स्टाईलिश खेळाची निमिर्ती पिक्सालॉट लॅब्सस द्वारे करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -