घरदेश-विदेशगुजरातमध्ये हाय अलर्ट; पाकिस्तामधून घुसखोरीची शक्यता

गुजरातमध्ये हाय अलर्ट; पाकिस्तामधून घुसखोरीची शक्यता

Subscribe

गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट पाकिस्तानने आखल्यामुळे गुजरातच्या समुद्रकिनाऱ्या लगत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशभरात काही दिवसांपूर्वी श्रीलंकेमार्गे ६ दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीनंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. आता त्या पाठोपाठ गुजरातमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतामध्ये पाकिस्तानचे कमांडोज कच्छमधून घुसखोरी करण्याची शक्यता आहे. यामुळे गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवू शकतात, असा इशारा नौदलाने गुजरातच्या तटरक्षक दलाला दिला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आली आहे. तसेच हल्ल्यांसाठी जैश ए मोहम्मदच्या अंडरवॉटर विंगने दहशतवाद्यांना खास प्रशिक्षण देखील दिले आहे, अशी माहिती नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी दिली आहे.

- Advertisement -

नौदलाला मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट पाकिस्तानने आखला आहे. यासाठी पाकिस्तानचे कमांडोज कच्चमधून घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपली असून यावेळी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांना याबाबत माहिती मिळताच बॉर्डर सिक्योरिटी फोर्स, इंडियन कोस्ट गार्ड यांनी हाय अलर्ट जारी केला आहे.


हेही वाचा – भारतात श्रीलंकेमार्गे घुसले ६ दहशतवादी; हाय अलर्ट जारी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -