घरगणेशोत्सव २०१९गणेशभक्तांची मनधरणी करण्यासाठी पोलीस आयुक्तांची नवी युक्ती

गणेशभक्तांची मनधरणी करण्यासाठी पोलीस आयुक्तांची नवी युक्ती

Subscribe

मंडळांच्या गणेश आरतींना हजेरी लावण्यास सुरुवात

गणेशभक्तांच्या मंगल पर्वाचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवात यंदा मंडळांची संख्या घटल्याने भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. गणेशभक्तांची मनधरणी करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नवीन युक्ती लढविली असून गणेश मंडळांच्या गणेश आरतींना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. विश्वास नांगरे-पाटील यांनी आपलं महानगर’च्या नाशिक आवृत्तीच्या कार्यालयास मंगळवारी (ता.३) सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी संवाद साधला.

यंदाच्या वर्षी शहरात 692 सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १३४ ने गणेश मंडळांची संख्या कमी झाली आहे. विशेषत: मौल्यवान आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये ही घट झाली आहे. वर्गणी मिळण्यास येणार्‍या अडचणी, नियम व अटींचा झालेला मार आणि पुढे होणारे वाद यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवास नापसंती दर्शविली आहे. मंडळांची नाराजी दूर करण्यासाठी मंडळांच्या गणेश आरतीस हजेरी लावत आहे, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -