घरमुंबईमहसूल कर्मचार्‍यांचा संप जिल्ह्यातील कामकाज ठप्प

महसूल कर्मचार्‍यांचा संप जिल्ह्यातील कामकाज ठप्प

Subscribe

राज्यातील महसूल कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. यासंपामध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचार्‍यांनी आपला सहभाग दिल्याने पुर्ण जिल्ह्यातील महसूल कार्यालयांमध्ये शुकशुकाट झाला असून सर्व कामे ठप्प झाली आहेत.

महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. या संपामध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सामिल झाले आहेत. ब गटातील 11 नायब तहसीलदार आणि क गटातील 201 अव्वल कारकुन, ड वर्गातील 57 कर्मचारी काम बंद करून आंदेालनात सहभागी झाले आहेत. या संपात तलाठी आणि मंडळ अधिकरी सहभागी झालेले नाहीत.

- Advertisement -

नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकार्‍याचा दर्जा, पदाचा ग्रेड पे वाढवणे, महसूल लिपिक पदनाम बदलून महसूल सहायक करणे, पदोन्नतीनंतर वेतन श्रेणीतील त्रुटी दुर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी पदोननती देणे, दांगट समितीनुसार पदे मंजूर करणे, नव्याने आकृतीबंध तयार करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे, खनिकर्म निरिक्षक हे अव्वल कारकुन दर्जांचे करणे, यासह इतर अनेक मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तहसील कार्यालयासह प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने महसूल कारभार ठप्प झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -