घरक्रीडासौरभसोबत कमी संवादामुळे आमच्या जोडीला यश मिळते!

सौरभसोबत कमी संवादामुळे आमच्या जोडीला यश मिळते!

Subscribe

मनू भाकरचे उद्गार

कोणत्याही सांघिक खेळात यशस्वी होण्यासाठी संवाद हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, युवा नेमबाज मनू भाकरच्या मते तिच्यात आणि सौरभ चौधरीमध्ये कमी संवाद होत असल्याने त्यांच्या जोडीला यश मिळाले आहे. मनू आणि सौरभ या दोघांनी मिळून नेमबाजी विश्वचषकात सलग चार सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या दोघांनीही २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्येही आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे या स्पर्धेतही या जोडीचे सुवर्ण कामगिरीचे लक्ष्य आहे.

सौरभ आणि माझ्यात फारसा संवाद होत नाही. आम्हाला दोघांना वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. आम्ही फक्त स्वतःच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करतो. तो माझ्या कामगिरीचा फारसा विचार करत नाही आणि मी त्याच्या कामगिरीचा विचार करत नाही. आम्ही दोघेही स्वतःसाठी खेळतो आणि त्यामुळेच आम्हाला इतके यश मिळत आहे, असे मनूने सांगितले.

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिकला आता अवघे ७ महिने बाकी आहेत. या स्पर्धेत पदक मिळेल का, हे सांगणे अवघड आहे, असे मनू म्हणाली. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मला या स्पर्धेत पदक मिळेल का, हे सांगणे अवघड आहे. मात्र, मी जर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवू शकले, तर तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असेल, असे मनू म्हणाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -