घरदेश-विदेशतेलंगणामध्ये फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग; १० कामगारांचा मृत्यू

तेलंगणामध्ये फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग; १० कामगारांचा मृत्यू

Subscribe

तेलंगणामध्ये फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत १० कामगारांचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमी. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत तेलंगणा सरकारने जाहीर केली आहे.

तेलंगणामध्ये फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग लागली. या घटनेमध्ये १० कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, २ कामगार गंभीर जखमी झाले आहे. या कामगारांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळी ११ वाजता ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली. अग्निशमन दालाचे कर्मचारी आणि पोलिसांनी बचावकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

तेलंगणाच्या वारंगल शहराच्या कोतिलिंगाला भागात ही घटना घडली आहे. अचानक फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली. या कारखान्याला लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तेलंगणा पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे. या आगीमध्ये या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या १० कामगारांचा मृत्यू झाला. यामधील तीन कामगारांच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. तर दोन जण गंभीर जखमी झालेल्या कामगारांवर उपचार सुरु आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे जखमी कामगारांना योग्य उपचार देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -