घरमहाराष्ट्रनाशिककारच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

कारच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

Subscribe

भरधाव वेगाने गाडी चालवत दिली धडक, वाहनचालक फरार

नाशिक : भरधाव कारने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. २५) रात्री गंगापूररोडवर घडली. धनराज अनराज गुंदेचा (८२, रा.प्रमोदनगर) असे जखमींचे नाव आहे.

सेकंड एम्पायर हॉटेलसमोर, प्रमोदनगर, गंगापूर रोड येथून पायी जात असताना, गुंदेचा यांना पाठीमागून कारची धडक बसली. अपघातानंतर कारचालक फरार झाला. अयोध्या कॉलनीकडून ही कार (एमएच १५, ई एक्स९९५१) आली होती. कारचालक भरधाव असल्याने, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात गुंदेचा गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी रोहन प्रसाद वेलदे यांनी गंगापूर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -