घरटेक-वेक'या' स्मार्टफोनमध्ये WhatsApp होणार बंद; पाहा लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का?

‘या’ स्मार्टफोनमध्ये WhatsApp होणार बंद; पाहा लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का?

Subscribe

व्हॉट्सअ‍ॅपकडून हे अॅप्लिकेशन आता iOS 8 साठी व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नसल्याची माहिती WABetaInfo यांनी ट्वीट करून दिली

सोशल मीडियातील लोकप्रिय आणि सर्वाधिक वापर होत असलेलं अॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सकरिता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सर्वच सोशल मीडिया युजर्समध्ये प्रसिद्ध असणारे हे इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप आता काही ठराविक स्मार्टफोनमध्ये बंद होणार असून चालणार नाही. या स्मार्टफोनच्या यादीमध्ये तुमचा तर फोन नाही न्.. हे तपासा. व्हॉट्सअ‍ॅपकडून हे अॅप्लिकेशन आता iOS 8 साठी व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नसल्याची माहिती WABetaInfo यांनी ट्वीट करून दिली आहे.

- Advertisement -

अॅपलच्या iOS 8 या ऑपरेटिंग सिस्टमवर यापुढे व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. तर या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर लगेच अनइन्स्टॉल करू नका. कारण तुम्ही ते अनइन्स्टॉल केलं तर त्यानंतर तुम्ही पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा इन्स्टॉल करू शकणार नाही. जुन्या सिस्टमवर आधारित असणारे iOS 8 चे व्हॉट्सअ‍ॅप चालत असून iPhoneची कॅपेटिब्लिटी १ फेब्रुवारी २०२० मध्ये संपणार आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ने दिलेल्या माहितीनुसार,२.३.७ व्हर्जनच्या अॅड्रॉईड स्मार्टफोन्स युझर्स आणि iOS 7 वर चालणाऱ्या iPhone यूझर्सला फेब्रवारी २०२०पासून व्हॉट्सअ‍ॅप सुरू राहणं बंद करणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या मते या निर्णयांचा परिणाम जास्त युझर्सवर होणार नसून जे लोक खूपच जुने अँड्रॉईड स्मार्टफोन्स आणि आयफोन्स वापर करत असतील त्या युजर्सवरच याचा प्रभाव पडणार आहे. वेळोवेळी विविध स्मार्टफोन्सना कंपनीकडून सॉफ्टवेअर अपडेट्स देत असल्याने त्यांनी त्याचा तोटा होणार नाही.

कंपनीने स्पष्ट केले आहे की,४.०.३ किंवा त्यापेक्षा जास्त व्हर्जनचे स्मार्टफोन्स तसेच iOS 8 पेक्षा वरचे व्हर्जन वापरणाऱ्या आयफोन युझर्सला व्हॉट्सअॅपच्या निर्णयाचा तोटा होणार नसल्याचे सांगितले आहे. Windows फोनमध्ये WhatsApp ३१ डिसेंबर २०१९ नंतर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -