घरUncategorizedताजमहालमध्ये नमाज पठणाला बंदी

ताजमहालमध्ये नमाज पठणाला बंदी

Subscribe

मुस्लिम बांधवांनी अन्य मशिदींमध्ये जाऊन नमाज पठण करावे असा सल्ला दिला आहे.कारण ताजमहाल हे सात आश्चर्यांपैकी एक आहे

ताजमहाल हे सात आश्चर्यांपैकी एक आहे. त्यामुळे ताजमहालवर नमाज पठण करता येणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. शिवाय दुसऱ्या मशिदींमध्ये जाऊन मुस्लिम बांधव नमाज पठण करु शकतात, असे सांगत ताजमहालवरील नमाज पठणाला बंदी करण्यात आली आहे. ताजमहालमध्ये नमाज पठणासाठी दाखल केलेली याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.

 नेमके काय झाले?

ताजमहालमध्ये लाखो पर्यटक येत असतात. ताजमहाल परीसरात असणाऱ्या मशिदीमध्ये दर शुक्रवारी नमाज पठण केले जाते. पण ताजमहाल प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार नमाज पठणासाठी अनेक लोक बाहेरुन येत होती त्यामुळे ताजमहालमधील सुरक्षेस अडथळा येत होता. म्हणूनच ताजमहाल प्रशासनाने फक्त स्थानिकांनाच या ठिकाणी नमाज पठणास परवानगी असल्याचे पत्रक काढले. त्यानुसार ओळखपत्रावरील पत्त्याच्या आधारे नमाज पठणासाठी ताजमहाल परीसरात सोडले जात होते.

- Advertisement -

निर्णयानंतर कोर्टात धाव

मस्जिदमध्ये कोणत्याही मुस्लिम माणसाला नमाज पठणाचा अधिकार आहे, असे असताना ताजमहाल प्रशासनाचे आदेश चुकीचे आहेत. त्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेला फेटाळून लावत ताजमहाल परीसरात कोणालाही नमाज पठणाला परवानगी नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

पर्यटकांनाही अडथळा

ताजमहालला वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. दर शुक्रवारी नमाजावेळी ताजमहालची दारे पर्यटकांसाठी नमाजाच्यावेळी बंद करण्यात येतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होते. मुस्लिम बांधवांनी अन्य मशिदींमध्ये जाऊन नमाज पठण करावे असा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -