घरमहाराष्ट्रनाशिकजळगाव-नेरूरच्या पैठणी दुकानातील दरोड्याचा प्रयत्न मजुरांनी हाणून पाडला

जळगाव-नेरूरच्या पैठणी दुकानातील दरोड्याचा प्रयत्न मजुरांनी हाणून पाडला

Subscribe

चार महिन्यापूर्वीच येवल्यात झालेल्या पैठणीच्या दुकानातील चोरीचा तपास पोलिसांनी मोठ्या शिथापीने लावला होता. त्यानंतर पुन्ही एकदा पैठणीचे दुकानचं चोरट्यांनी टार्गेट केले.

चार महिन्यापूर्वीच येवल्यात झालेल्या पैठणीच्या दुकानातील चोरीचा तपास पोलिसांनी मोठ्या शिथापीने लावला होता. त्यानंतर पुन्ही एकदा पैठणीचे दुकानचं चोरट्यांनी टार्गेट केले. तालुक्यातील जळगाव नेरूर येथील सौभाग्य पैठणीच्या दुकानात चोरट्यांनी दरोड्याचा नियोजित कट रचला होता. परंतु दुकानाचे मालक संतोष केशव राजगुरू (वय ३२, रा. जळगाव नेरूर/एरंडगाव) यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की,

२६ ऑक्टोंबर रोजी रात्री उशीरा २.३० वाजता दुकानाचे शटर टामीच्या सहाय्याने वाकवून चोरांनी दरोड्यांचा प्रयत्न केला. तेव्हा आत झोपलेल्या मजुरांना जाग आली आणि सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर त्यांना दुकानाचे शटर चोर तोडत असल्याचे दिसून आले. तातडीने त्यांनी मालकाला सांगीतले. संतोष केशव राजगुरू यांनी त्यांच्या साथीदारासह चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी तोपर्यंत दुकानामागे असलेली मोटारसायकल एम. एच. १५ वाय. २९१३ घेऊन पळ काढला. मालकाने त्यांच्या साथीदारांसह चोरांचा पाठलाग केला. तेव्हा त्यांनी प्रदीप ज्ञानेश्वर कासार (रा. रांजणगाव गाढवे, ता. राहता) याला पकडले. याबाबत त्यांनी येवला पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंग साळवे यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्यांना तेथे चोरीला गेलेली हिरो कंपनीची मोटारसायकल, एम.एच. १५ वाय २९१३ सह अन्य हिरो होंडा सीडी डॉन- एम. एच. १७ सी. ए. २४७७, तसेच एम. एच. १७ डब्ल्यू. ९५७८, सह इतर हत्यारे, दोन लोखंडी टॉमी स्कूल ड्रायव्हर, पिस्तूलसारखे दिसणारे २/२ एअरगन, गलुर आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर फरार आरोपींची माहिती त्यांना मिळाली आहे.

- Advertisement -

हे आहेच फरार आरोपी 

विठ्ठल सावळीराम पवार (रा. रांजणगाव,गाढवे), भरत (तात्या) काळे (रा. गणेश नगर, ता राहता), सुनील विठ्ठल पवार यांचा मेव्हणा (रा. श्रीरामपूर), आनंदा (टकल्या)अनिल काळे (रा. गणेश नगर, रा. राहता), गोकुळ कारभारी मासाळ (रा. रांजणगाव गाढवे,ता. राहता) या आरोपींचा तपास लागला नसून सर्व आरोपी फरार झाले आहे. त्यांच्यावर भादवि कलम ३९५, ३९९, ४०२ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

स्वयंघोषित ज्योतिषाने दिलेली मृत्युची तारीख हुकली; तब्बल १४ वर्षांनी झाले निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -