घरमुंबईअभिजित बिचुकले राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार; बिचुकलेंचे आमदारांना पत्र

अभिजित बिचुकले राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार; बिचुकलेंचे आमदारांना पत्र

Subscribe

जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेऊन मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा आणि मंत्रीमंडळामध्ये योग्य मंत्रीपदावर विराजमान व्हावे, असे आवाहन बिचुकले यांनी पत्रामार्फत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना केले आहे.

विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे आणि ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाचे स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी राज्यातील समस्त नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसांत आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकले पत्रात म्हणाले आहेत. याशिवाय जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेऊन मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा आणि मंत्रीमंडळामध्ये योग्य मंत्रीपदावर विराजमान व्हावे, असे देखील आवाहन बिचुकले यांनी पत्रामार्फत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना केले आहे.


हेही वाचा – राज्यपालांचे भाजपला आमंत्रण

- Advertisement -

काय म्हटले आहे पत्रात?

पत्रामध्ये अभिजीत बिचुकले म्हणतात की, ‘मी स्वत: गेली २० वर्षे समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे, हे आपणांस माहिती आहेच. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध संविधानाने दिलेला अधिकार वापरुन २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अखेर सर्व लोकसभा आणि विधानसभा लढविल्या आहेत. मला राष्ट्रपती पद मिळावे यासाठी देखील मी प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक २०१९ साठी मी १८२ वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.’

त्याचबरोबर ‘या पत्राद्वारे सध्या नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी, होतकरु, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो की, आपण मला सर्वांनी आपले जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्यावा आणि माझ्या मंत्रीमंडळामध्ये योग्य पदावर विराजमान व्हावे. इतर पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी स्वत;चे कसे आणि किती वेळा भले करुन घेतले आहे हे तुम्हाला माहिती असेलच. तेव्हा अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे हीच अपेक्षा. मी येणाऱ्या दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे’, असे बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -