घरमहाराष्ट्रसावधान! तुमचं लाईट बिल वाढणार

सावधान! तुमचं लाईट बिल वाढणार

Subscribe

महावितरणला ३० हजार ८४२ कोटींचा तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आता महावितरणने दरवाढीला प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की!

सावधान! तुमचं वीज बिल वाढणार आहे. ऐकून शॉक बसला ना? पण लवकरच तुमचे वीज बिल वाढणार आहे. कारण तुम्हाला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणला तब्बल ३० हजार ८४२ कोटींचा तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी महावितरणने आता ग्राहकांच्या खिशामध्ये हात घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंपनीने जबरदस्त दरवाढ प्रस्तावित केला आहे. गेल्या दीड वर्षामध्ये कंपनीला तब्बल ३० हजार ८४२ कोटींचा तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी महावितरणने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात तुमच्या वीज बिलामध्ये चांगलीच वाढ झालेली असेल, हे नक्की! महावितरणने घरगुती वीज वापरासाठी ५ टक्के तर, कृषी वापरासाठी ३५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे आगामी काळात तुमच्या विजेच्या बिलात वाढ झाली तर शॉक होऊ नका.

कुणी वीज घेता का वीज

महागड्या वीज दरामुळे अनेक बड्या उद्योजकांनी महावितरणला टाटा केले आहे.परिणामी, वीज तर आहे पण खरेदीदार नाही अशी अवस्था महावितरणची झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ करण्याची मागणी कंपनीने वीज नियामक आयोगाकडे केली आहे. मोठ्या प्रमाणावर तोटा झाल्याने आता कंपनीने वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज दरवाढ झाल्यास त्याचा भुर्दंड हा ग्राहकांना बसणार आहे. महावितरणला २०१८च्या सहा महिन्यामध्ये ग्राहकांच्या खिशातून १५ हजार ७१४ कोटी तर, २०१९- २० या वर्षात १५ हजार १२८ कोटी वसुल करायचे आहेत. मंगळवारी वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. आजघडीला बाजारात २.५० पैसे दराने वीज उपलब्ध आहे. तर, महावितरणचा वीज दर हा ४ रूपये आहे. परिणामी, अनेक उद्योगांनी महावितरणकडून वीज घेणे बंद केले आहे. महावितरणकडे वीज तर आहे. पण, खरेदीदार नाही अशी अवस्था आहे.

- Advertisement -

वीज महागणार

महावितरणचा प्रस्ताव मान्य झाल्यास घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिटच्या पुढे ५ टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे. कृषी पंपासाठी ३५ ट्क्के दरवाढ होणार आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा, शाळा आणि विद्यालयांमध्ये २ ते २० टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा प्रस्ताव आहे. रेल्वे, मेट्रो, मोनो, कृषी पंप आणि मॉल्सच्या वीज दरांमध्ये १०९ टकक्यांची दरवाढ प्रस्तावित आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्डंद बसणार हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -