घरमुंबईशिका आरोग्याची एबीसीडी आणि रहा फिट

शिका आरोग्याची एबीसीडी आणि रहा फिट

Subscribe

पालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्यदायी जीवनशैली प्रचारासाठी 'एबीसीडी - अॅक्टिव्ह बॉडी, चांगला डाएट' हा उपक्रम सुरू केला आहे.

मधुमेहासारख्या गंभीर न समजल्या जाणाऱ्या आजाराला आळा घालण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने नवीन आरोग्य बाराखडी ही संकल्पना सुरू केली आहे. याअंतर्गत आरोग्यदायी जीवनशैलीच्या प्रचारासाठी ‘एबीसीडी – अॅक्टिव्ह बॉडी, चांगला डाएट’ हा उपक्रम सुरू केला आहे.

मुंबई महापालिकेची ही नवी बाराखडी आपल्याला आरोग्य जपण्यास शिकवणार आहे. चांगली जीवनशैली जोपासून आजारांपासून दूर ठेवण्यास ही बाराखडी नक्की मदत करेल. इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन (आयडीएफ) च्या अनुमानानुसार, भारतात मधुमेहाचे ७३ दशलक्ष रुग्ण आहेत आणि २०४५ पर्यंत हे प्रमाण दुप्पट होईल. तर, मुंबईमध्ये मधुमेहाचे १०.९ टक्के आणि मधुमेह पूर्व स्थितीचे प्रमाण १५ टक्के इतके आहे जे राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत अधिक आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या ABCD या बाराखडीमध्ये,
A – Active
B- Body
C- चांगला
D- Diet

मुंबई महापालिकेच्या या नव्या बाराखडीनुसार तुम्हाला अॅक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बॉडीची म्हणजे शरीराची हालचाल व्हावी तसंच तुमच्या शरीराबाबत तुम्हाला माहिती असायला हवी. याचसोबत चांगला आहार घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींमुळे जीवनशैलीशी निगडीत आजार दूर राहण्यास नक्कीच मदत होईल.

- Advertisement -

आयडीएफच्या अनुसार, या वर्षाच्या मोहिमेचा हेतू कुटुंब आणि मधुमेह हा आहे. पालिकेद्वारे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची काळजी, प्रतिबंध आणि उपचार यामध्ये कुटुंबातील भूमिकेस प्रोत्साहन देण्यात येत आहे.


हेही वाचा – रक्ताची माहिती देण्यास रक्तपेढ्यांची टाळाटाळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -