घरमनोरंजनरिंकु राजगुरू लवकरच वेबसिरीजमध्ये दिसणार

रिंकु राजगुरू लवकरच वेबसिरीजमध्ये दिसणार

Subscribe

याबाबतची माहिती रिंकुने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. हिंदी वेबसिरीजमध्ये पदार्पण करत असलेली रिंकु मणिकर्णिका फेम अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

‘सैराट’ चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेतून मराठीसह इतर भाषिकांच्या मनावर अधिराज्य केलेल्या रिंकु राजगुरू लवकरच वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. याबाबतची माहिती रिंकुने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. हिंदी वेबसिरीजमध्ये पदार्पण करत असलेली रिंकु मणिकर्णिका फेम अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

- Advertisement -

‘बेपनाह’ (Bepannah) आणि ‘निशा और उसके कझिन्स’ (Nisha Aur Uske Cousins) मध्ये दिसलेला अभिनेता ताहिर शब्बीर आता दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हॉटस्टार (Hotstar) वर ताहिरची ‘100’ नावाची वेब सिरीज येत असून यामध्ये रिंकु राजगुरू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रिंकु सोबतच या वेबसिरीजमध्ये ताहिर आणि फोर मोअर शॉर्टस (4 more shots) फेम राजीव सिध्दार्थ सुद्धा दिसणार आहेत.

- Advertisement -

ताहिर नुकताच नेटफ्लिक्स (Netflix) वरील गिल्टी (Guilty) आणि वूटवरील (Voot) लॉ अॅण्ड ऑनर (Law and Honour) या वेब सिरीजमध्ये दिसला आहे. ताहिरच्या (RAT FILMS) रॅट फिल्म या बॅनर अंतर्गत या वेबसिरीजची निर्मिती होत आहे. ‘सैराट’नंतर रिंकुचा ‘कागर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

View this post on Instagram

Life begins at the end of your comfort zone. ??

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -