घरमहाराष्ट्रदुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू

दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू

Subscribe

ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता घडली असून अशोका मार्ग या ठिकाणी ही दुचाकी घसरली

नाशिकमध्ये भरधाव दुचाकी स्लीप झाली. ही दुचाकी स्लीप झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता घडली असून अशोका मार्ग या ठिकाणी ही दुचाकी घसरली. दुचाकी घसरून मृत्यू झालेल्या चालकाचे नाव सौरभ शाम खोडदे असे आहे. हा २० वर्षीय तरूण नाशिक मधील गांधीनगर टाकळी रोड या भागात राहतो.

सौरभ खोडदे हा भरधाव वेगाने दुचाकीवरुन अशोका मार्ग येथून जात होता. तो कृष्णा मिठाई दुकानासमोर आला असता दुचाकी घसरली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार संजय भिसे करत आहे, असे पोलिसांनी सांगितले.


नाशिकमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १२ जणांवर गुन्हा दाखल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -