घरमुंबईमुंबईत पुन्हा हिट अँड प्रकरण; मुलीचा जागीच मृत्यू

मुंबईत पुन्हा हिट अँड प्रकरण; मुलीचा जागीच मृत्यू

Subscribe

चुनाभट्टी परिसरात एका भरधाव कारने तरुणीला धडक दिल्याने एका २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात एका भरधाव कारने तरुणीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या धडकेत २३ वर्षीय अर्चना पारठे या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. सकाळपासूनच नातेवाईकांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या केला आहे. तर, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान पोलिसांच्या कारवाईवर आम्ही समाधानी आहोत त्यामुळे आम्ही आमच्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेत आहोत अशी माहिती अर्चना पार्टीच्या कुटुंबियांनी दिली.

- Advertisement -

मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांचा पवित्रा

शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास काही लोक मद्यधुंद अवस्थेतच एसंट कार घेऊन निघाले. पण, ड्रायव्हरचा तोल गेला आणि कार अनेक वाहनांना धडक देत फुटपाथवर चढली. त्याच वेळी फुटपाथवर चालणाऱ्या ३ तरुणींपैकी एका तरुणीला कारने धडक दिली. यात २३ वर्षीय तरुणी अर्चना पारठे हीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही गाडी स्वदेशी मिल चाळ नंबर ११३ मध्ये घुसली. वाहन चालकांना चुनाभट्टी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, यामध्ये आणखी काही महिला जखमी झाल्या असून या महिलेला जवळील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मुंबईत आतापर्यंत हिट अँड रन अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. दरम्यान, जो पर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मुलीच्या नातेवाईकांनी घेतली होती.

- Advertisement -

हेही वाचा – केईएम पुन्हा वादात; नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -