घरताज्या घडामोडीम्हणून विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

म्हणून विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Subscribe

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बाबत केलेल्या व्यक्तव्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले असताना आता हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांच्या चहापानाला आम्ही जाणार नाही, अशी भूमिका घेतली. एवढंच नाहीतर त्यांनी यावेळी शिवसेनेला देखील टार्गेट केले आहे. सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारली जाईल हे शिवसेनेला ठरवायचे आहे, असे म्हणत सत्तेची लाचारी त्यांना सौदेबाजी करण्यास मजबूर करत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. राहुल गांधी यांच्या व्यक्तव्याचा उभा देश निषेध करत असल्याचे सांगत राहुल गांधी यांना सावरकर म्हणजे काय हे ठाऊक नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

या सरकारला अधिवेशनाचे गांभीर्य नाही

या सरकारला अधिवेशनाचे गांभीर्य नाही त्यामुळेच यांनी इतके दिवस असताना देखील मंत्रिमंडळ विस्तार केला नसल्याची टीका केली. महाराष्ट्रामध्ये सरकारचा शपथविधी होऊन अनेक दिवस लोटले तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. तीन पक्षाच्या विसंवादामुळे कुठले खाते कोणाकडे राहिले हे देखील समजत नसल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच झालेले खातेवाटप तात्पुरते आहे, असे ट्विट राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्याने केले आहे. त्यामुळे खात्यासंदर्भातले नेमकं उत्तर कोण देणार? तसेच आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे उत्तरदायित्व स्वीकारणार की नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच या अधिवेशनात कागदोपत्री फार्स वापर करत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूरचे हिवाळी अधिवेशन ही फक्त औपचारिकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रति हेक्टरची आणि फळबागांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. किमान त्याची तरी पूर्तता तातडीने होईल अशी अपेक्षा होती. मात्र कॅबिनेट बैठकांमध्ये अद्याप निर्णय का झाला नाही? अवकाळी पावसामुळे ९३ लक्ष हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार २३ हजार कोटींची तात्काळ मदत अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हवी आहे, मग मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा शब्द पाळून दाखवावा. अधिवेशनात सरकारला याची आम्ही आठवण करुन देणार आहोत. या सरकारने कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये सरसकट कसर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याचे मागणी केली होती. आता सात बारा कधी कोरा होणार किंवा याचा कार्यक्रम तरी सरकारने जाहीर करावा, अशीही मागणी फडणवीस यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -