घरमहाराष्ट्रपगार न मिळाल्यामुळे प्राध्यापकाने रोखला मुंबई-गोवा महामार्ग

पगार न मिळाल्यामुळे प्राध्यापकाने रोखला मुंबई-गोवा महामार्ग

Subscribe

विनंती अर्ज करूनही पगार काही या प्राध्यापकाला मिळाला आहे. अखेर मग या प्राध्यापकाचा संतापाचा भडाका उडाला.

एकीकडे देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात आंदोलन केली जात आहेत. मात्र दुसरीकडे पगार न मिळल्यामुळे एका प्राध्यापकांने मुंबई-गोवा महामार्गावर धिंगाणा घातला. रायगडात या प्राध्यापकाने थकीत पगार मिळविण्यासाठी महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासमोर असलेला मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली. तसंच त्याने महामार्गावर दगड आडवे ठेवून टायर पेटवले. त्यामुळे काहीकाळ मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.

या प्राध्यपकाचे नाव सुभाष कदम (वय ४६) असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकवतात. त्यांचा एक वर्षापासून पगार रखडला आहे. पगार मिळण्यासाठी सतत विनंतीचा अर्ज केले. मात्र पगार काही मिळाला नाही त्यामुळे अखेर त्यांच्या संतापाचा भडाका उडाला. मुंबई-गोवा महामार्गावर त्यांनी दुपारी साडेबारच्या सुमारास रोखून धरला. टायर जाळले, दगड आडवे ठेवले यामुळे महामार्गावरील अर्धा तास वाहतूक खोळबंली. त्यानंतर पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी धनंजय मुंडे? त्या घटनेमुळे मंत्रिपद हुकणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -