घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंच्या विरोधात पोस्ट; शिवसैनिकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे केले मुंडन

उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोस्ट; शिवसैनिकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे केले मुंडन

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर टीकात्मक पोस्ट केल्यामुळे शिवसैनिकांनी टीका करणाऱ्याचे मुंडन करत त्याला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हिरामणी तिवारी असे पीडित तरुणाचे नाव आहे. राहुल तिवारी या नावाने त्याचे फेसबुकवर अकाऊंट असून त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जालियानवाला बाग वक्तव्यावर टीका केली होती. या टीकेनंतर भडकलेल्या शिवसैनिकांनी तिवारीच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली आणि त्याचे मुंडन केले. तसेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात पुन्हा पोस्ट टाकू नये, अशी धमकीही दिली. हिरामणी तिवारी हा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेसाठी काम करत असल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोस्ट टाकल्यामुळे संतापलेले शिवसैनिक रविवारी वडाळा येथील हिरामणी तिवारीच्या घरी पोहोचले. तिवारीला घरातून बाहेर काढत त्यांनी थोड्या अंतरावर नेले. पोस्ट का केली? याचा जाब विचारत त्याला मारहाण केली. मारहणीनंतर ट्रिमरने हिरामणी तिवारीचे मुंडन करत पुन्हा अशी पोस्ट न टाकण्याची समज दिली. त्यानंतर तिवारी यांच्या कुटुंबियांनी वडाळा टीटी पोलीस स्थानकात शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

आपल्यावरील हल्ल्याबाबत बोलताना तिवारी यांनी माध्यमांना सांगितले की, उद्धव ठाकरेंनी जामिया आंदोलनाची तुलना जालियानवाला बाग हत्याकांडाशी केल्यामुळे मी व्यथित झालो होतो. त्यावरुनच मी त्यांच्यावर तात्विक विरोध करणारी पोस्ट टाकली होती. त्यानंतर मला पोस्ट डिलिट करण्यासंबंधी फोनवरून धमक्या येत होत्या. मी पोस्ट मागे घेतली नाही, म्हणून रविवारी शिवसैनिकांनी मला मारहाण केली. या मारहाणीमध्ये हिरामणीच्या कानाचा पडदा फाटला असल्याची माहिती त्याने माध्यमांना दिली.

हिरामणी तिवारीने दिलेल्या माहितीनुसार तो बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची विचारधारा माननारा आहे. सध्या तो संघटनेत सक्रिय नाही. मात्र विश्व हिंदू परिषदेकडून नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्याने सहभाग घेतला असल्याची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -