घरमहाराष्ट्रनववर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेने गोव्याला जाताय; मग ही बातमी वाचाच!

नववर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेने गोव्याला जाताय; मग ही बातमी वाचाच!

Subscribe

२७ डिसेंबर रोजी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास १० गाड्या रद्द होणार आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने गोवा गाठण्याचा मनसुबा असलेल्यांना प्रवासाचा मार्ग बदलावा लागू शकतो. कारण २७ डिसेंबर रोजी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास १० गाड्या रद्द होणार आहेत. त्यामुळे रेल्वेने जलद गोवा गाठण्याच्या पर्यटकांच्या मनसुब्यावर पाणी पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेच्या आडवली रेल्वे स्थानकावर २७ डिसेंबर रोजी लूप लाइनचे काम हाती घेण्यात येणार आहे. रात्री ११.४५ वाजता या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मध्यरात्रीपासून निवसर ते विलवडे या स्थानकांदरम्यान ८ तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. परिणामी या काळात लांबपल्ल्याच्या दहा गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई, पुणेसह नाशिकमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता

या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार

मुंबई-मंगलुरू एक्स्प्रेस १२१३३, गांधीधाम-नागरकॉइल एक्स्प्रेस १६३३५, कोचुवेली-डेहराडून एक्स्प्रेस २२६५९, दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, एर्नाकुलम-हजरत निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस, एलटीटी-मडगाव डबलडेकर, कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस, मडगाव-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर या १० गाड्या ठिकठिकाणी थांबवून ठेवल्या जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -