घरमनोरंजनऋत्विक घटक यांच्या चित्रपटांद्वारे भाजपा करणार CAA कायद्याबाबत जनजागृती

ऋत्विक घटक यांच्या चित्रपटांद्वारे भाजपा करणार CAA कायद्याबाबत जनजागृती

Subscribe

सीएए कायद्याबाबत देशातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यासाठी भाजप ज्येष्ठ सिनेनिर्माते ऋत्विक घटक यांच्या चित्रपटांचा उपयोग करणार आहे.

सुधारित नागरिकता दुरुस्ती कायद्यामुळे देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे सीएएला विरोध होत असताना दुसरीकडे या कायद्याच्या समर्थनार्थ देखील काही नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. दरम्यान सीएए कायद्याबाबत देशातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी भाजप ज्येष्ठ सिनेनिर्माते ऋत्विक घटक यांच्या चित्रपटांचा उपयोग करणार आहे.

विस्थापितांच्या वेदना मांडल्या

६०च्या दशकात ऋत्विक घटक, सत्यजित रे आणि मृणाल सेन यांनी भारतीय चित्रपटात एक नवीन प्रवाह सुरु केला. आपल्या चित्रपटातून ऋत्विक यांनी १९४७च्या फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लोकांच्या वेदना आणि परिस्थिती चित्रपटातून पुढे आणली होती. घटक यांनी मेघे ढाका तारा (ढगांनी वेढलेला तारा), सुवर्णरेखा आणि कोमल गंधारा हे तीन चित्रपट तयार केले होते. फाळणीनंतर पश्चिम बंगालला आलेल्या लाखो निर्वासितांच्या वेदना त्यांनी या चित्रपटांच्या माध्यमातून मांडल्या.

- Advertisement -

हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना; ठाकरे सरकारला लागलं ग्रहण

निर्वासितांचे त्रास व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे वर्णन

आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता युवा मोर्चा या भाजपाच्या युवा संघटनेने ६ मिनिटांची व्हिडिओ क्लिप तयार केली आहे. यामध्ये त्यांनी निर्वासितांचे त्रास व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे वर्णन करण्यासाठी घटक यांच्या चित्रपटाच्या दृश्यांचा दाखला दिला आहे. आयएएनएसने दिलेल्या बातमीत भाजप नेते सामिक भट्टाचार्य यांचा हवाला देत सांगितले आहे की, हा व्हिडिओ घटकांच्या पूर्वीच्या काळापासून सुरू होऊन सध्याच्या काळात येतो. यात १९४६च्या ग्रेट कोलकाता किलिंग्जचा समावेश करण्यात आला आहे.

ऋत्विक घटक यांच्याविषयी

ऋत्विक घटक हे डाव्या विचारसरणीचे चित्रपट निर्माता होते. १९५५ मध्ये हद्दपार करण्यात आल्यानंतर ते सीपीआयचे सदस्य होते. सीपीआयची सांस्कृतिक शाखा असलेल्या इंडियन पीपुल्स थिएटर असोसिएशनच्या प्रमुख सदस्यांमध्ये त्यांचादेखील समावेश होता. सामाजिक प्रश्न, महिलांच्या समस्या आणि फाळणीच्या मुद्द्यांवर चित्रपट निर्मितीसाठी ऋत्विक घटक यांना ओळखण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -