घरमहाराष्ट्रपुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Subscribe

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना उर्से टोलनाका येथे तर खोपोली टोलनाका येथे देखील मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष आणि आलेल्या सलग सुट्ट्या यामुळे पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना उर्से टोलनाका येथे तर खोपोली टोलनाका येथे देखील मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि वाहन चालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन ते तीन किलोमीटर च्या रांगा लागल्या आहेत.

दोन ते तीन किमीच्या लांब रांगा

आज शनिवार, रविवार त्यात काही तासांवर येऊन ठेपलेले नवीन वर्ष याच निमित्ताने सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक हे लोणावळा, खंडाळा या पर्यटनस्थळी त्यांचे आपसूक पाऊल वळताना पाहायला मिळतात. अशावेळी पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर वाहतूक कोंडी होते. आज शनिवार रोजी सकाळी खोपोली टोलनाका आणि बोरघाटात कासवगतीने वाहतूक सुरू होती. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या सर्व परिस्थितीत वाहन चालक अगदीच हैराण झाले होते. अनेकांनी तर प्रवास करणे टाळले असून पर्यायी मार्ग शोधत आहेत.

- Advertisement -

वाहतुक पोलिसांनी कर्तव्य बजावावे

वाहतूक कोंडी पासून स्वतःची सुटका करण्यासाठी अनेक नागरिक नवीन वर्ष उत्साहात पार पाडण्यासाठी जवळच असलेले पर्यटनस्थळ गाठत आहेत. मात्र, लोणावळा आणि खंडाळा हे सर्वांचे आवडीचे ठिकाण असल्याने शहरात आणि द्रुतगतिमार्गावर येणाऱ्या दोन तीन दिवसात मोठी आणि नेहमीच वाहतूक कोंडी होणार यात काही शंका नाही. अशावेळी स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी आपले कर्तव्य बजावणे महत्वाचे आहे.

शनिवार-रविवार सुट्टीमुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर तुफान ट्रॅफिक! वाहनांच्या लांबच लांब रांगा! #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 28, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -