घरमनोरंजनVIDEO - गोव्याच्या किनाऱ्यावर अण्णा आणि शेवंताचा रोमान्स

VIDEO – गोव्याच्या किनाऱ्यावर अण्णा आणि शेवंताचा रोमान्स

Subscribe

गोव्याच्या किनाऱ्यावर अण्णा आणि शेवंताचा झालेला रोमान्स लवकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसेच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील बऱ्याच व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या आहेत. ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. तर अण्णा नाईकांची व्यक्तीरेखा अभिनेते माधव अभ्यंकर साकारत आहेत. दरम्यान, अवघे दोन दिवस नवीन वर्षाला राहिले असून २०२० या नवीन वर्षाची सुरुवात अण्णा आणि शेवंता गोव्याच्या किनाऱ्यापासून करणार आहेत.

- Advertisement -

अण्णा – शेवंताचा रोमान्स

शेवंताला ज्यावेळी अण्णा तुला कुठे जायचे?, असे विचारतो. त्यावर शेवंता गोव्याला जाऊया, असे सांगते. त्यानंतर अण्णा आणि शेवंता गोव्याला दाखल होतात. गोव्याला धमाल मस्ती करताना हे दोघे दिसत आहेत. सध्या झी वाहिनीने प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत अण्णा आणि शेवंता रोमान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत २३९.४९३ लोकांनी हा पाहिले आहे. तसेच हा महाएपिसोड प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार असून येत्या ३१ डिसेंबर रोजी १०.३० वाजता या दोघांचा गोव्याच्या किनाऱ्यावरील रोमान्स पाहता येणार आहे.


हेही वाचा – ‘लागीर झालं जी’ मालिकेतील शीतलीचा ग्लॅमरस लूक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -